रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री! आयुक्तांनी सादर केला अहवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra state women's commission notice to thane police commissioner in roshni shinde case
maharashtra state women's commission notice to thane police commissioner in roshni shinde case
social share
google news

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाने ठाण्यातील राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. रोशनी शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे. आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात आज पोलीस आयुक्तांनी अहवाल सादर केला.

ठाण्यातील कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या म्हणजेच शिवसैनिक महिलांनी मारहाण केली. हे प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच रोशनी शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत थेट शिंदे गटातील महिलांची नावं घेतली आहेत.

हेही वाचा >> ‘ठाकरे, विचारे, आव्हाड रोशनी शिंदेंचा जीवही घेऊ शकतात’, शिंदेंच्या पत्राने खळबळ

पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिलांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदेंनी केलेला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कासारवडवली पोलिसांत या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, रोशनी शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांबद्दल अवमानकारक पोस्ट केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.

राज्य महिला आयोगाची नोटीस, अहवाल सादर करण्याचे निर्देश

रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाण प्रकरणाची आता महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना नोटीस दिली आहे.

ADVERTISEMENT

फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून रोशनी शिंदे यांना जमावाने मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली. सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “ठाण्यातून लढणार अन् जिंकूनही येणार!” शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंनी दिलं आव्हान

महाराष्ट्र राज्य महिला अधिनियम, 1993 च्या कलम 12(2) व 12 (3) नुसार केलेल्या कार्यवाहीसह संपूर्ण प्रकरणाचा अहवाल घेऊन हजर रहावे, असं आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. अहवाल सादर करण्यास गुरुवारी (6 एप्रिल) दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. आयुक्तांनी या प्रकरणातील अहवाल सादर केला आहे.

रोशनी शिंदे यांच्यावर लिलावतीत उपचार

युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांना सिव्हिल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर ठाण्यातीलच संपदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT