Maratha Reservation : ‘कंटेनरभरून पुरावे देतो, अध्यादेश काढा’, मनोज जरांगे झाले आक्रमक

प्रशांत गोमाणे

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जातप्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्याअभावी वेळ लागणार असेल तर राज्यसरकारला आणि समितीला एका दिवसात जीआर काढता येईल, इतके पुरावे द्यायला आम्ही तयार असल्याची भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

manoj jarange patil appeals maharashtra government maharashtra reservation frome obc eknath shinde girish mahajan
manoj jarange patil appeals maharashtra government maharashtra reservation frome obc eknath shinde girish mahajan
social share
google news

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचे जालन्यात उपोषण सुरु आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या नवव्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून त्यांना सलाईनवर ठेवण्यात आले होते. या दरम्यान जरांगे पाटलांनी एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके रिक्षाभर, कंटेनर पुरावे असल्याचे सांगत सरकारने हे पुरावे घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आवाहन केले आहे. (manoj jarange patil appeals maharashtra government maharashtra reservation frome obc eknath shinde girish mahajan)

मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी चार दिवसाचा सरकारला अल्टिमेटल दिला होता. या अल्टिमेटमनंतर आंदोलनाच्या नवव्या दिवशी संध्याकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जातप्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्याअभावी वेळ लागणार असेल तर राज्यसरकारला आणि समितीला एका दिवसात जीआर काढता येईल, इतके पुरावे द्यायला आम्ही तयार असल्याची भूमिका मांडली.

हे ही वाचा : Ghaziabad: 14 वर्षाच्या मुलाने बापाच्या मांडीवरच तडफडून सोडला जीव! काय घडलं, कुणाची चूक? Inside Story…

संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येईल, अध्यादेश काढता येईल इतरे पुरावे आमच्याकडे आहेत. हे पुरावे आम्ही समितीकडे देण्याचे ठरवलं होते, पण समितीने काम केले नाही म्हणून हे पुरावे घरी ठेवल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले. तसेच आम्हाला सरकारचा अमुल्य वेळ वाया घालवायचा नाही. चार दिवसाचा वेळ वाया जाण्यापेक्षा तो जनतेच्या कामी यावा,अशी आमची भूमिका असल्याचे देखील जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारकडे जर पुरावे नसतील तर आम्ही पुरावा द्यायला तयार आहोत. एका दिवसात अध्यादेश निघेल इतके कायदेशीर पुरावे आमच्याकडे आहेत. हैदराबाद पासूनचे सर्व कागदपत्र द्यायला तयार आहोत. रिक्षाभर, कंटेनर पुरावे किंवा त्याही पेक्षा जास्तीचे पुरावे आमच्याकडे आहेत. पण सरकारची इच्छा शक्ती असेल तर एका कागदावरही निर्णय़ होईल असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp