Manoj Jarange Patil : प्रसाद लाडांचं विधान ऐकून जरांगे पाटलांच्या संतापाचा कडेलोट; म्हणाले, “तुला…”
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतंच जरांगे पाटलांना ”तुमचा बोलवता धनी कोण?” असा खडा सवाल केला होता. या सवालावर आता जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Reply to Prasad Lad : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुकारलेल्या आंदोलनाला एकीकडे काही आमदारांकडून समर्थन मिळत असताना, दुसरीकडे काही आमदार जरांगे पाटलांवर सवाल उपस्थित करत टीका करतायत. भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी नुकतंच जरांगे पाटलांना ”तुमचा बोलवता धनी कोण?” असा खडा सवाल केला होता. या सवालावर आता जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे पाटलांच्या या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (maratha reservation manoj jarange patil reply bjp prasad lad antarawali sarati maharashtra poliitics)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीआधीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परीषद घेतली होती. या पत्रकार परीषदेत जरांगे पाटलांना प्रसाद लाड यांनी केलेला ”तुमचा बोलवता धनी कोण?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी ”तुला सांगतो भेटल्यावर” असं उत्तर दिले आहे.
हे ही वाचा : Shiv Sena : उद्धव ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा
ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका का? तुमचा बोलवता धनी कोण? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला होता. तसेच नितेश राणे यांनी देखील ‘तुम्हाला नेमकं लिहून कोण देतोय?’ असा प्रश्न केला होता. हाच प्रश्न माध्यमांनी जरांगेना विचारला. यावर जरांगे म्हणाले, ”एकीकडे फोन करून मला गोडगोड बोलायचं”. ”आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे”.
देवेंद्र फडणवीसांवर टीका
मराठा तरूण शांतच आहे. पण यांना आंदोलन दडपायचं, वातावरण खराब करण्याची इच्छा यांची आहे.इंटरनेट बंद करून चिल्लर चिल्लर चाळे करतायत, अशी टीका जरांगे पाटलांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. एकीकडे बोलुन दाखवतो आणि दुसरीकडे गोड बोलतो. हे त्याचेच काम आहे, त्यांनी बोलून दाखवलं होतं 307 करायला लावेन, म्हणून भाजप संपतंय, असा हल्लाही जरांगे पाटलांनी नाव न घेता फडणवीसांवर केला. तसेच गोरगरीबाच्या पोराला मारं देतो आणि स्वत: ला उच्च नेता म्हणतो, आता तुला कळेल तु उच्च आहे की नाही? मतदानाची चिठ्ठ्या वाटण्याच्या लायकीचा आहेस अशी टीका देखील जरांगे पाटलांनी केली.