MNS: ‘राज ठाकरेंनी मला सांगितलं काम थांबव, फक्त तुझ्या येथील…’, वसंत मोरेंचा मोठा दावा
Vasant More vs MNS: पुणे: पुण्याचे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना आज (9 डिसेंबर) मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी चर्चेसाठी बोलावलं होतं. वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरेंनी मध्यस्थी केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीनंतरही वसंत मोरेंची नाराजी काही दूर झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, वसंत […]
ADVERTISEMENT

Vasant More vs MNS: पुणे: पुण्याचे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना आज (9 डिसेंबर) मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी चर्चेसाठी बोलावलं होतं. वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरेंनी मध्यस्थी केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीनंतरही वसंत मोरेंची नाराजी काही दूर झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, वसंत मोरेंनी पत्रकारांशी बोलताना एक मोठा खुलासा देखील केली.
वसंत मोरे हे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आहेत. मात्र मागील काही काळापासून ते पुणे मनसेतून बाजूला सारले गेले आहेत. जेव्हा राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवर जेव्हा वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केलेली तेव्हापासूनच वसंत मोरे आणि मनसेमधील अंतर वाढत गेलं आहे. असं असताना आता वसंत मोरेंनी असा दावा केला आहे की, राज ठाकरेंनी इतर ठिकाणची कामं थांबवायला सांगून फक्त त्यांच्या खडकवासला प्रभागातील कामंच पाहावा असा आदेश दिला आहे.
पाहा वसंत मोरे नेमकं काय म्हणाले:
‘मला साहेब ग्राह्य धरतात.. बाकीचा विषय नाही. मला दुसऱ्या पक्षात जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो. कोअर कमिटीने स्मशानात मीटिंग घ्यावी मी स्मशानात येईल. पण मी शहर कार्यालयात मीटिंगला येणार नाही. मला राज ठाकरेंनी आदेश दिला तरच मी शहर कार्यालयात जाईन.’
‘ज्या शहर कार्यालयात मी फुलं वेचली तिथं मी काटे वेचायला जाणार नाही. तिथे मी जी स्वप्नं पाहिली होती.. गुलाल तिथे महापालिकेचा उधळला जाईल असं मला वाटलं होतं. परंतु त्या ठिकाणी जो गुलाल उधळला गेला तो वसंत मोरेचं पद काढल्यानंतर उधळला गेला. मला वाटत होतं की, पुणे शहरात 25 नगरसेवक निवडून आल्यानंतर मला तिथे पेढे वाटता येतील. पण वसंत मोरेचं पद काढल्यानंतर पेढे वाटले गेले. या विषयामुळे मला तिथे जावं वाटत नाही.’