Ajit Pawar : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का?

ऋत्विक भालेकर

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का? असा प्रश्न आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं आहे. सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नड भाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत असाही दावा केला आहे. यानंतर अजित पवार यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का? असा प्रश्न आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं आहे. सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नड भाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत असाही दावा केला आहे. यानंतर अजित पवार यांनी बसवराज बोम्मईंवर टीका करत त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? असा सवाल केला आहे.

तुम्ही काय महाराष्ट्र मागायला निघालात का?

तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्यं करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्यांचा अजित पवार यांनी निषेध केला. लोकांचं लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्यं केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp