शरद पवार-अजित पवारांची भेट; जयंत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीत फूट नाही, कारण…’
शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचे स्पष्ट केले.
ADVERTISEMENT

Ajit Pawar Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
पुणे शहरानजीक असलेल्या कोरेगाव पार्क येथील उद्योगजक अतुल चोरडीया यांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची बैठक पार पडली. दोन्ही नेते का भेटले याची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचे सांगितले.
वाचा >> शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,’भेट झाली…’
सांगोला येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “कुणी कुणाला कधीही आणि कुठेही भेटू शकतो. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतीच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे. मी शरद पवारांबरोबर गेलो होतो आणि निघून आलो. बैठकीत काय चर्चा झाली मला माहिती नाही. माझी भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे.”
जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस
जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांचे बंधू जयसिंग पाटील यांना नोटीस आल्यानंतर पाटलांवर दबाव टाकणे सुरू असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, “माझ्या बंधूंना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीच्या संदर्भात त्यांनी माहिती विचारली. ते चार दिवसांपूर्वीच जाऊनही आले आहेत. त्यांना आवश्यक ती माहिती दिली. पण याचा इतर ठिकाणी संबंध जोडणं योग्य नाही.”