"राष्ट्रवादीचा बडा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार" मोहित कंबोज यांचा इशारा कुणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज इशारा करत आहेत? याची राजकीय वर्तुळात सुरू झाली चर्चा
One NCP Big Leader Will Meet Nawab Malik  Anil Deshmukh Soon Bjp Leader Mohit Kamboj Tweets This
One NCP Big Leader Will Meet Nawab Malik Anil Deshmukh Soon Bjp Leader Mohit Kamboj Tweets This

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत दिसणार या आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सेव्ह धिस ट्विट असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.

अनिल देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात तर नवाब मलिक यांना फेब्रुवारीत अटक

अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. आता राष्ट्रवादीच्या कोणत्या बड्या नेत्याचा नंबर या दोघांसोबत लागणार याची चर्चा रंगली आहे.

काय आहे मोहित कंबोज यांचं ट्विट?

Save This Tweet राष्ट्रवादीचा एक एकदम बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी केलं आहे. आता हा बडा नेता नेमका कोण? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोहित कंबोज हे नेमका कुणाकडे इशारा करत आहेत? याचीही चर्चा ट्विटरवर रंगली आहे.

नवाब मलिकांना अटक कशी करण्यात आली?

2017 साली इक्बाल कासकर, अनिस इब्राहिम, आणि दाऊद इब्राहिम यांच्याविरोधात ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकरला अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती.

22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नीरज गुंडे यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, 'सूत्रांकडून मिळालेली माहिती: दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने ईडीच्या कस्टडीत असताना महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे बरेच तपशील दिले आहेत. तसेच दाऊद आणि छोटा शकीलच्या भारतातील आणि परदेशातील गुंतवणुकीचा तपशीलही दिला आहे.'

23 फेब्रुवारी 2022 च्या पहाटेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं पथक पोहचलं. ज्यांनी जवळजवळ दोन तास घरातच त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेलं आणि दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.

अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ महिन्यात अटक

अगदी याचप्रमाणे नोव्हेंबर २०२१ महिन्यात अनिल देशमुख हे ईडीसमोर हजर झाले होते. त्यांच्यावर सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आऱोप आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनीच हा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण जेव्हा एप्रिल २०२१ महिन्यात हायकोर्टात गेलं तेव्हा अनिल देशमुख यांना पद सोडावं लागलं. तर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना अटक झाली. आता मोहीत कंबोज यांनी जे ट्विट केलंय त्यानुसार राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच या दोघांना भेटणार म्हणजेच एका बड्या नेत्याला अटक होणार असेच संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in