NCP : प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादीच्या फुटीचं खापर फोडलं शिवसेनेवर, म्हणाले…
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी फुटली होती. मात्र या फुटीचे कारण समोर आले नव्हते. आता राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या फुटीमागचं कारण सांगितले आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Latest Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री तर इतर 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी फुटली होती. मात्र या फुटीचे कारण समोर आले नव्हते. आता राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या फुटीमागचं कारण सांगितले आहे. (praful patel tell the reason of ncp split ajit pawar dcm bjp shinde government maharashtra politics)
मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी फुटीचे कारण सांगितले आहे. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे गेल्याने सगळच संपले ना. राज्यात शिवसेना ज्यावेळेस फुटली तेव्हा आम्ही सर्व एकत्र होतो. पण शिवसेना स्वत:च्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून भासवत होती, अशी टीका प्रफुल पटेल यांनी यावेळी शिवसेनेवर केली.
महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची युती होणार होती, या युतीत राष्ट्रवादीलाच खास करून तडजोड करावी लागली होती. कारण आम्हाला माहिती होते, शिवसेनेची एक वेगळी भूमिका असेल, कॉंग्रेसची वेगळी भूमिका असेल, त्यामुळे तडजोड फक्त राष्ट्रवादीलाच करावा लागणार आहे अशी खंत देखील प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली होती. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्येही तडजोड करावी लागणार आहे आणि महाविकास आघाडीतही करत होतो, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.