Rahul Gandhi News: खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई, कोण आहेत ते नेते?

मुंबई तक

कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहूल गांधी यांच्या आधी अनेक नेते ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत, हे नेते कोण आहेत ? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई,
खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई,
social share
google news

Rahul Gandhi disqualified from membership of lok sabha : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. संसद सचिवालयाने या संदर्भात नोटीफीकेशनही जारी केले आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनाव (Modi Surname Case) प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी जाणार की राहणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर लोकसभा अध्यक्षांनी यावर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आधी अनेक नेते ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत, हे नेते कोण आहेत ? हे जाणून घेऊयात.(rahul gandhi disqualified as mp from lalu yadav to jayalalitha these mps and mlas disqualified from past)

लालू यादव

माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांना 2013 ला चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती. या शिक्षेनंतर त्याची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

आजम खान

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आजम खान (Ajam Khan) यांना गेल्या वर्षी हेट स्पीच प्रकरणात शिक्षा झाली होती.यानंतर रामपुर सदर भागातून त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

जयललिता

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता (jayalalithaa) यांची दोनदा खासदारकी रद्द झाली होती. 2002 साली भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर 2014 साली बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झाली होती. या दोन्ही प्रकरणात त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp