अवधूत तटकरेंच्या भाजपप्रवेशानंतर उदय सामंत - सुनिल तटकरेंची भेट : बंद दाराआड चर्चा

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं
Uday Samant - Sunil Tatkare
Uday Samant - Sunil Tatkare Mumbai Tak

रायगड : जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे यांच्यासह नगरसेवक कीर्ती भट, कुसुम गुप्ता आणि नरेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, अवधूत तटकरेंच्या पक्षप्रवेशाची बातमी ताजी असतानाच तिकडे रायगडमध्ये उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याचीही माहिती आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ही भेट झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे.

सामंत-तटकरे अजित पवार म्हणाले :

सामंत-तटकरे भेटीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चांना काही अर्थ नाही. ते म्हणाले, मागे जिल्हा नियोजन समितीवेळी त्यांच्या मुलगी आदिती तटकरे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्या काळात काही कामं मंजूर झाली असतील, आता नवीन पालकमंत्री उदय सामंत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या आमदारांची मदत व्हावी यासाठीच ती भेट आणि चर्चा झाली असेल असं १०० टक्के माझं मतं आहे. त्यामुळे या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका,’ असे त्यांनी म्हटले आहे.

तटकरे कुटुंबियांतील राजकीय वैर :

अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तटकरे कुटुंबियांमध्ये कमालीचे राजकीय वाद सुरु आहेत. सुनिल तटकरे हे स्वत: किंवा त्यांच्या मुलांचाच विचार करत असल्याचा आरोप करत त्यांचे बंधू आणि माजी आमदार अनिल तटकरे, त्यांचा मुलगा माजी आमदार अवधूत तटकरे यांच्यातील आणि सुनिल तटकरे यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण याला फार यश आलं नव्हतं. त्याचवेळी 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. तर 2019 साली अवधूत तटकरे आणि माजी आमदार अनिल तटकरे हेही शिवसेनेत दाखल झाले. मात्र ते तिथंही फारसे रमले नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in