Raj Thackeray : ‘कुंपणच शेत खातंय’, राज ठाकरेंनी कोकणवासीयांसमोर मांडलं जमिनींच गणित

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

raj thackeray tell maths of lands kokani people konkan jagar yatra
raj thackeray tell maths of lands kokani people konkan jagar yatra
social share
google news

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने पळस्पे फाटा ते खारपाडा दरम्यान कोकण जागर यात्रा काढली. या यात्रेनंतर कोकणवासीयांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. महामार्ग बनल्यावर आजुबाजूंच्या जमीनीचे काय भाव होतात, हे गणित एकदा समजून घ्या. तुमच्या जमीनीत तशाच ठेवा, व्यापाऱ्यांच्या हाती देऊ नका, असे कळकळीचे आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केले.(raj thackeray tell maths of lands kokani people konkan jagar yatra)

राज्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवे झाल्यावर देशाला कळलं असा रस्ता होऊ शकतो. मग देशात रस्ते व्हायला सुरुवात केली. पण ज्या महाराष्ट्राने आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्राची अशी अवस्था झाल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. या खड्यांबाबत तुम्हाला राग कसा येत नाही? रस्त्यावरील खड्डे भरालं, अपघातात जे गेले त्यांचं काय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी कोकणवासियांना केला.

हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘माझ्या वडिलांना चोरलं, तुमच्या दिल्लीतल्या वडीलांमध्ये..’, ठाकरे संतापले!

सारखी कंत्राटी काढायची, नवीन टेंडर भरायची, त्यातून नवीन टक्के घ्यायचे, आणि तुम्हाला दिवसभर खड्डयातून न्यायचं, असा हा कारभार सुरु असल्याची टीका राज ठाकरेंनी सरकारवर केली. अत्यंत मामुली किमतीत तुमच्या जमिनी विकत घेतल्या जातायत, आणि मग रस्ता झाल्यावर 100 पट दराने या जमीनी विकतील, हे लोक पैसै कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार ,असे देखील राज ठाकरेंनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुपणचं शेत खातंय, बाहेरची लोक नाही आहेत. आपलीच लोक आपल्याच लोकांकडे जाऊन व्यापाऱ्यांना जमिन विकतायत. रस्ता बनल्यावर आजुबाजूंच्या जमीनीचे काय भाव होतात, हे गणित समजून एकदा घ्या. तुमच्या जमीनीत तशाच ठेवा, व्यापाऱ्यांच्या हाती देऊ नका, असा सल्ला देखील राज ठाकरेंनी कोकणवासियांना दिला.

अंडरवेअरची रिर्टन गिफ्ट मी पण देईन…

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर पोलिस स्टेशनमध्ये एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. माझ्या पदाधिकाऱ्यांना सरकारने पोलीस स्टेशनमध्ये अंडरवेयरवर बसवलं, सरकार कोणतही असो, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेला नसतो, त्यामुळे अंडरवेअरची रिर्टन गिफ्ट मी पण देऊ शकतो असा सरकारला इशारा देत राज ठाकरे म्हणाले फक्त विचार करत होतो दिसतील कसे? पण यांच्या अंगावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मला वाटतं रस्त्यावरचे पाहिलेले बरे, असे राज ठाकरे म्हणालेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘थापाड्या बोलणार होतो पण..’; फडणवीसांवर ठाकरेंचा पुन्हा वार..

गेल्या 17 वर्षात 15 हजार 566 कोटी रस्त्यावर खर्च झाले आहेत तर साडेसहाशे कोटी चांद्रयान गेलं, ते इथे उतरवायला पाहिजे होतं, तिकडे जाऊन खड्डे बघण्यात काय अर्थ आहे असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT