CM शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर तुपकरांच्या बहुतांश मागण्या मान्य : जलसमाधी आंदोलनाला ब्रेक

मुंबई तक

ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनाला स्थगिती देण्यात आली असून सरकारने दिलेला शब्द येत्या 15 दिवसांत पाळला नाही आणि मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी

बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनाला स्थगिती देण्यात आली असून सरकारने दिलेला शब्द येत्या 15 दिवसांत पाळला नाही आणि मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करू, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. सह्याद्री अतिथी गृहात दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक पार पडली. यावेळी त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.

तुपकर यांनी कोणत्या मागण्या मांडल्या?

  • शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी.

हे वाचलं का?

    follow whatsapp