“शिवाजी महाराज रेडे कापायला सुरतेवरून गुवाहाटीला गेले नव्हते”, राऊत-पटोले संतापले

योगेश पांडे

bharat Gogawale Mla Disqualification : शिवाजी महाराज गेले होते म्हणून मी सुरतला गेलो होतो, असे विधान भरत गोगावले यांनी केले. त्यावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांनी टोले लगावले.

ADVERTISEMENT

Mla Disqualification latest news : Sanjay Raut and nana patole hits out at bharat gogawale.
Mla Disqualification latest news : Sanjay Raut and nana patole hits out at bharat gogawale.
social share
google news

Bharat Gogawale MLa Disqualification Sanjay Raut : “शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून मला वाटले चांगले ठिकाण असेल म्हणून मी तिकडे गेलो”, असं उत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सुरतला जाण्याबद्दलच्या प्रश्नावर दिलं. त्यावरूनच आता विरोधकांनी खडेबोल सुनावले आहेत. खासदार संजय राऊतांनी गुवाहाटी जाण्यावरून खडेबोल सुनावले, तर हे शिवाजी महाराजांशी तुलना करण्याच्या लायकीचे नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.

गोगावलेंच्या विधाना संजय राऊत म्हणतात…

“छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, ते ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिथे गेलात. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते”, असे संजय राऊत म्हणाले.

शिवाजी महाराजांचा अपमान -नाना पटोले

“छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन, घोषणा देऊन हे सत्तेत येतात; पण सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान कसा करायचा हे त्याला विसरत नाही”, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >> “मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला?”

“छत्रपती शिवाजी महाराज गुजरातमधील सुरतमध्ये घेण्यासाठी नव्हते गेले. तिथे अत्याचारी व्यवस्था होती. त्या अत्याचारी व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी आणि त्यांनी जो आपल्या लोकांचा खजाना लुटला होता, तो परत आणण्यासाठी गेले होते. तो इतिहास त्यांना माहिती नाही म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे”, अशा शब्दात पटोलेंनी टोला लगावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp