Maharashtra politics: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘या’ पुतण्यांनी सोडली काकांची साथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar ajit pawar this nephew left his uncle's side in Maharashtra politics
sharad pawar ajit pawar this nephew left his uncle's side in Maharashtra politics
social share
google news

राज्यात अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर इतर 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली.या फुटीसोबत काका-पुतण्या वादही चव्हाट्यावर आला आहे. मात्र महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद काही नवीन नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्या वादाच्या अनेक घटना घडल्या आहे. हे काका-पुतणे कोण होते आणि नेमका वाद काय होता? हे जाणून घेऊयात. (sharad pawar ajit pawar this nephew left his uncle’s side in Maharashtra politics)

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या काका- पुतण्यातील वाद सर्वाना सर्वश्रूत असेलच. बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राजकारणात आलेले आणि राजकीय धडे गिरवलेले राज ठाकरे यांना शिवसेनेत भक्कम समर्थन होते आणि कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ होते. पण पक्षातून डावलल्या गेल्याच्या भावनेतून त्यांनी 27 नोव्हेंबर 2005 मध्ये शिवसेना सोडली आणि 9 मार्च 2006 साली मनसे या पक्षाची स्थापना केली.

गोपिनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे

स्वर्गीय भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणजेच बीड असं समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. आपल्या काकांचा हात धरून धनंजय मुंडे राजकारणात आले. 1995 च्या विधानसभा निवडणूकीपासून ते राजकारणात आले. 2009 मध्ये पंकजा मुंडे यांची एंट्री झाली आणि धनंजय मुंडे दुखावले गेले. या दरम्यान धनंजय मुंडेची राष्ट्रवादीशी जवळीत वाढली आणि त्यांनी 2013 साली पक्षात प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडेनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”

अनिल देशमुख आणि आशिष देशमुख

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्यात देखील वाद झाला होता. आशिष देशमुख यांनी कॉंग्रेसमधून 2014 साली निवडणूक लढवत काका अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. पण काका अनिल देशमुख यांनी या पराभवाचा बदला 2019 साली घेतला. अनिल देशमुख यांनी 2019 च्या निवडणूकीत पुतण्या आशिष देशमुख यांचा पराभूत केला होता. आता आशिष देशमुख भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

सुनील तटकरे आणि अवधुत तटकरे

राष्ट्रवादीच्या आणखी एका घराण्यात काका-पुतण्याचा वाद झाला होता. राष्ट्रवादी क़ॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीतून कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर 2019 मध्ये चुलत बहिण अदिती तटकरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यामुळे अवधूत हे राजकारणापासून दुर झाले होते. पुढे शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. मात्र 14 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.

ADVERTISEMENT

क्षीरसागर काका-पुतणे

बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्याचा संघर्ष अवघ्या बीडला सर्वश्रूत आहे. क्षीरसागर घराण्याने 3 वेळा खासदारकी भुषवली. काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या कमालीचा वाद विकोपाला गेला. 2019 च्या निवडणूकीत काका-पुतण्यात थेट लढत पाहण्यास मिळाली. पुतण्या संदीप यांनी राष्ट्रवादीकडून तर काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणूकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : दिलीप वळसे-पाटील रोहित पवारांना म्हणाले, ‘पाहिजे तर आमदारकी सोडतो’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT