NCP: सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

साहिल जोशी

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Two factions in the NCP: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असल्याचं आता निश्चित केलं आहे. खरा पक्ष कोणता आणि त्यासंदर्भातील कायद्याबाबत येत्या 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा की अजित पवारांचा याचा निर्णय 6 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. (sharad pawar and ajit pawar faction central election commission has accepted that there are two factions in the ncp)

6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोग हा निर्णय घेऊ शकतं. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी बंड करून ते सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केली होती. ज्यामध्ये अशी मागणी केली होती की, सुनावणी आधी आमची बाजू ऐकून घ्यावी.

हे ही वाचा : Shiv Sena MLA Disqualification : शिंदे विरुद्ध ठाकरे! विधानसभा अध्यक्षाच्या कोर्टात काय झालं?

याच्या आधारे 8 सप्टेंबरला दोन्ही गटाला आपआपलं म्हणणं मांडण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने आपलं म्हणणं लिखित स्वरूपात आयोगासमोर मांडलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर आता आज (14 सप्टेंबर) निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाने मान्य केलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत. यासोबत निवडणूक आयोगाने हे देखील स्पष्ट केलं आहे की, पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत निश्चित निर्णय  6 ऑक्टोबरला घेतला जाणार आहे.

अजित पवार यांनी 2 जुलैला 9 मंत्र्यासह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुट पडल्याचे मान्य केले नव्हते. या शपथविधीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच 30 जुनला अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा आणि अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर शरद पवारांनी दिल्लीत जाऊन नेत्यांची बैठक घेऊन तेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत फुट पडल्याचे मान्य केले नव्हते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Supriya Sule : गुप्तेंसमोर सुप्रिया सुळे का रडल्या, खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात काय घडलं?

दरम्यान जरी शरद पवार राष्ट्रवादीत फुट पडल्याचे मान्य करत असले नसले तरी आता निवडणूक आयोगाने मात्र आता राष्ट्रवादीत फुट पडल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटातून दोन परस्पर विरोधी दावे आलेले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ऱाष्ट्रवादीचा खरा पक्ष कोणता आणि त्यासंदर्भातील कायद्याबाबत येत्या 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.त्यामुळे ज्या गोष्टी शिवसेने बाबतीत घडलेल्या, दोन्ही गटांचा सुनावण्या पार पडलेल्या त्यांना अॅफिडेबिट सादर कराव्या लागल्या होत्या, त्या गोष्टी आता राष्ट्रवादीबाबत घडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT