Rajan Salavi : तर रिफायनरीचं स्वागत केलेले आमदार साळवी कंपनीच्याविरोधात उतरणार
रत्नागिरी : आम्ही केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधातही उतरु, असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरी माध्यमांशी बोलत होते. बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीचं स्वागत करण्याची भूमिका साळवी यांनी घेतली आहे. मात्र त्यासोबतच त्यांनी काही मागण्याही केल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विरोधात उतरण्याचाही इशारा त्यांनी […]
ADVERTISEMENT

रत्नागिरी : आम्ही केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधातही उतरु, असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरी माध्यमांशी बोलत होते. बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीचं स्वागत करण्याची भूमिका साळवी यांनी घेतली आहे. मात्र त्यासोबतच त्यांनी काही मागण्याही केल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विरोधात उतरण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार राजन साळवी म्हणाले, रिफायनरीबाबत काल झालेल्या बैठकीत मी 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत, त्या आता तत्वतः मान्य झाल्या आहेत. पण पुढे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर कंपनीच्या विरोधात उतरावे लागेल अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.
मागण्या तत्वतः मान्य झाल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचे सीईओ आणि त्यांची यंत्रणा सोबत बैठक करावी लागेल. उद्योग विभाग आणि कंपनीचे अधिकाऱ्यांमध्ये मुद्दे मांडले जातील. त्यांच्याकडून अंतिम मंजूरी घेतली जाईल. जनतेच्या वतीने ज्या मागण्या दिल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा, आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीत स्वागत करु. पण दुदैवाने या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरावे लागेल हि माझी स्पष्ट भूमिका आहे, असं साळवी म्हणाले.
बारसू-सोलगाव रिफायनरीला कोयना धरणातून पाणी पुरवणार :
दरम्यान, कालच्या बैठकीनंतर बोलताना उदय सामंत यांनी राजन साळवी यांच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, या बैठकीत आमदार राजन साळवी यांनी अर्जूना आणि जामदा डॅममधून पाणी उपसा केल्यास स्थानिक पातळीवर पाणी टंचाई होऊ शकते, असं मत मांडलं. आमचा देखील तोच सर्वे आहे. त्यामुळे आता कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.