तेरावा खासदार ठाकरेंची साथ सोडणार? CM शिंदे - किर्तीकर यांची मध्यरात्री 'वर्षा'वर भेट

शिंदे - किर्तीकर भेटीनंतर ठाकरे गटामध्ये चर्चांणा उधाणं आलं आहे...
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikar File photo

मुंंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फुट पडली. शिंदे यांच्यासमवेत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर 12 खासदारांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहिर केला. याशिवाय पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींनीही ठाकरेंची साथ सोडली. अशातच आता गजानन किर्तीकर यांच्या रुपानं आणखी एक खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या चर्चांसाठी मध्यरात्री खासदार गजानन किर्तीकर यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली एक गुप्त भेट कारण ठरली आहे. खासदार किर्तीकर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. गणपती दर्शनासह या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती आहे. याच भेटीनंतर खासदार किर्तीकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

Gajanan Kirtikar
एकनाथ शिंदे विदर्भात उद्धव ठाकरेंना देणार धक्का?' दौऱ्यापूर्वी 6 जिल्ह्यांत नेत्यांवर सोपवली जबाबदारी

खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यास हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जाईल. तेरावा खासदार शिंदे गटात गेल्यास शिंदे यांची लोकसभेत संख्याबळाच्या दृष्टीने ताकद वाढेल, ज्याचा फायदा आगामी काळातील न्यायालयीन खटले आणि निवडणूक आयोगसमोरील अपीलसाठी होईल. सोबतच शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती देखील किर्तीकर यांच्या सोबत फुटू शकते. कारण स्वतः किर्तीकरच या समितीचे अध्यक्ष आहेत.

यापूर्वीही झालीही होती शिंदे-किर्तीकर यांची भेट :

सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यामध्येही एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले होते. किर्तीकर आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले होते.

Gajanan Kirtikar
RSS मुख्यालयाची सुरक्षा केंद्रीय यंत्रणा करणार : सरसंघचालक भागवत यांनाही Z+ कवच प्रदान

एकनाथ शिंदे यांनी सध्या थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. यावर न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांना प्राथमिक टप्प्यात पक्षात उभी फूट पडल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आणि मनोहर जोशी यांचीही भेट घेतली होती. या नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच शिंदे यांचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले गेले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in