Nitish Kumlar : कधी RJD, कधी BJP! नितीश कुमारांच्या ‘आयाराम गयाराम’चा हा आहे इतिहास

भागवत हिरेकर

आधी समता पक्ष आणि नंतर जेडीयूच्या स्थापनेपासून नितीशकुमार भाजपसोबत आहेत. 2013 मध्ये भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि याच आधारावर नितीश यांनी 1996 पासून सुरू असलेली युती तोडण्याची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

When did he go with RJD, when did he coordinate with BJP... Know when Nitish Kumar changed his mind?
When did he go with RJD, when did he coordinate with BJP... Know when Nitish Kumar changed his mind?
social share
google news

Bihar Political Crisis Updates : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला साप-शिडीचा राजकीय खेळ आता टोकाला पोहोचताना दिसत आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (JDU) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तंब झाले आहे. नितीशकुमार हे नव्या सरकारमध्येही मुख्यमंत्री असणार आहेत. बिहार भाजपने विधिमंडळ गट नेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड केली आहे. पण, या सगळ्यात महत्त्वाचा चर्चा होतेय, ती म्हणजे नितीश कुमारांची आया राम-गया राम भूमिकेबद्दल!

नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी राजभवन गाठून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बिहारमधील बदलते राजकारण आणि पाटण्यातील वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता नितीश कुमार यांचा विचार कधी बदलला आणि ते राजदसोबत कधी गेले आणि भाजपसोबत कधी आले याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Nitish Kumar with rjd Leader tejashwi yadav
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (फाइल फोटो)

2-13 मध्ये तोडली होती भाजपसोबतची युती

आधी समता पक्ष आणि नंतर जेडीयूच्या स्थापनेपासून नितीशकुमार भाजपसोबत आहेत. 2013 मध्ये भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि याच मुद्द्यावरून नितीश कुमारांनी 1996 पासून असलेली युती तोडण्याची घोषणा केली.

हेही वाचा >> “ओबीसींवर आक्रमण होणार…”, नारायण राणेंचा शिंदे सरकारच्या भूमिकेला विरोध

त्यावेळी 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत जेडीयू 117 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष होता. काँग्रेसचे चार आमदार, चार अपक्ष आणि सीपीआयच्या एका आमदारानेही विश्वासदर्शक ठरावावर मतदानादरम्यान नितीश कुमार सरकारच्या बाजूने मतदान केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp