Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं
पटना येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे. त्याचा अजेंडा काय आहे? त्यात कोण सहभागी होणार? एकमत होणार की संघर्ष आणि कोणाला काय मिळणार?
ADVERTISEMENT

position Unity 2024 : मागील दोन महिने मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात फिरले आहेत. या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की, भाजपचा विजय रथ रोखायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. त्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच छोट्या प्रादेशिक पक्षांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या भेटी आणि बैठकांमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या मेहनतीची पाटण्यातील बैठकीनंतर लिटमस टेस्ट असणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर आज (23 जून) पटना येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे. त्याचा अजेंडा काय आहे? त्यात कोण सहभागी होणार? एकमत होणार की संघर्ष आणि कोणाला काय मिळणार? बैठक एक आहे, पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यात बिगर भाजप पक्षांची बैठक होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या यादीनुसार या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच JDU आणि RJD व्यतिरिक्त आणखी 15 पक्ष सामील होत आहेत. विरोधी पक्षाच्या महाआघाडीच्या काही नेत्यांकडून ज्या प्रकारची विधाने करण्यात आली आहेत, त्यानंतर एकजुटीच्या अजेंड्यावर होत असलेली ही बैठक ‘अधिकृत अजेंडा’पुरतीच मर्यादित राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बैठकीला काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी उपस्थित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, पीडीपी सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. सीताराम येचुरी आणि डी राजा यांसारखे अनेक डावे नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत.
कोणते नेते बैठकीत असणार?
राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, शरद पवार, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा हे बैठकीत एकत्र दिसणार आहेत. जेडीयूच्या वतीने नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव विरोधी बैठकीचे आयोजक म्हणून उपस्थित राहणार आहेत.