Congress MLA : विधानसभा अध्यक्षांचा झटका! काँग्रेसच्या सहा आमदारांना केलं अपात्र
6 rebel Congress MLAs disqualified : राज्यसभा निवडणुकीत व्हीपचे पालन न करणे काँग्रेस आमदारांना भोवले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हिमाचल प्रदेश राजकीय संघर्ष
व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांना ठरवलं अपात्र
काँग्रेसचे सरकार वाचले
Himachal political crisis : हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी पक्षादेश डावलून क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना झटका दिला. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदार अपात्र घोषित केले. विधानसभा अध्यक्ष पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या सर्व 6 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. ते म्हणाले की 'पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत 6 आमदारांविरुद्धची तक्रार मंत्री हर्षवर्धन यांच्यामार्फत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली होती. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून निर्णय दिला.' (six congress mla disqualified in himachal pradesh by assembly speaker)
ADVERTISEMENT
विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, "आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली, पण पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केले. आणि पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मतदान केले नाही. मी सर्व बाजू ऐकल्या. माझ्या आदेशाची तीस पाने आहेत... मी प्रकरण पूर्णपणे ऐकले. मी दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्या आणि मग माझा निर्णय दिला."
या आमदारांना केलं अपात्र
सुधीर शर्मा, रवि ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल अशी अपात्र ठरलेल्या काँग्रेस आमदारांची नावे आहेत. या सर्व आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केले होते.
हे वाचलं का?
हिमाचलमध्ये पुढे काय?
हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 40 आमदार होते. 68 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा 35 होता. राज्यसभा निवडणुकीत सहा आमदारांनी क्रॉस व्होट केले.
या आमदारांच्या बंडखोरीनंतर बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादुई आकड्यापेक्षा एकाने कमी असलेल्या संख्येच्या खेळात काँग्रेस 40 वरून 34 वर आली होती. आता सभापतींनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, पंकजा मुंडेंना उतरवणार मैदानात?
त्यामुळे विधानसभेचे संख्याबळ आता 62 झाले आहे. आता परिस्थिती बदलली असून, बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा आता 32 झाला आहे. राज्यात भाजपचे 25 आमदार असून तीन अपक्षही त्यांच्या बाजूने आहेत. काँग्रेसचे चार आमदार मुख्यमंत्र्यांच्या ब्रेकफास्टला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतरही सरकारवरचा धोका अजूनही कमी झालेला नाही, असेच दिसत आहे.
ADVERTISEMENT
राज्यसभा निवडणुकीत त्याचा कसा परिणाम झाला?
हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. ती जिंकण्यासाठी 35 आमदारांची मतांची गरज होती. काँग्रेसकडे 40 आमदार आहेत, त्यामुळे पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. भाजपचे येथे 25 आमदार आहेत. त्यांना 10 मते कमी पडली, तरीही पक्षाने हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा >> ठाकरेंचे उमेदवार 'या' चिन्हावर लढवणार लोकसभा
निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. तीन अपक्ष आमदारांनीही भाजप उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. अखेर चिठ्ठी ड्रा करून निकाल घोषित करण्यात आला आणि भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT