आदित्य ठाकरेंनी वाचली यादी, राज्यव्यापी मेळाव्यात एकनाथ शिंदेंना घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

aditya thackeray criticize cm eknath shinde statewide meeting worli
aditya thackeray criticize cm eknath shinde statewide meeting worli
social share
google news

Maharashtra Political News : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी आज वरळी येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात शिवसेनेने मुंबईत केलेल्या कामांची संपूर्ण यादीच वाचून दाखवली. या यादीनंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांचा घटनाबाह्य सरकार असा उल्लेख करत, आज जसे मी प्रेझेंटेशन दिलेय,तसे त्यांनी वर्षभरातील मुंबईतील कामांचे प्रेझेटेशन द्यावे, असे थेट आव्हान; दिले आहे. या आव्हानाला मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (aditya thackeray criticize cm eknath shinde thackeray group statewide meeting worli )

राज्यात काही लोक दुसऱ्यांच्या वडिलांना चोरून आपले राजकीय करीअर पुढे न्यायचा प्रयत्न करतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांच्यावर केली. काही लोक दुसऱ्यांच्या वडिलांना चोरायचा सतत प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या वडिलांबरोबर फोटो टाकून आपले राजकीय करीअर पुढे कसे न्यायच हे प्रयत्न करतात असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच वर्षभरापूर्वी जेव्हा गद्दारी झाली, तेव्हा माझ्या देखील वडिलांचे नाव आणि फोटो नेण्याचा प्रयत्न झाला. पण माझ्या वडिलांनीही दाखवलं ते काय आहेत. लवकरच माझ्या वडिलांचे वडील जे आपल्या सर्वांना आशिर्वाद देत आहेत, ते देखील दाखवणार आहे, ते म्हणजे काय होते, आणि काय आहेत, असे देखील आदित्य ठाकरे (Aditya thackeray) म्हणाले.

हे ही वाचा : Manisha Kayande : उद्धव ठाकरेंना झटका, महिला आमदार लवकरच शिंदेंच्या सेनेत!

जाहिरात बाजीवरून टोमणा

काही लोकांनी (शिंदे गटाने) जाहिरातीचा इतका धसका घेतलाय की, उद्याचा वर्धापण दिन, पण आजच ट्विट केला आहे. घटनाबाह्य सरकारने उद्याच्या शुभेच्छा आजच देऊन टाकल्या आहेत. कदाचित दिल्लीवरून निरोप आला असेल, आजच ट्विट करा नाहीतर पाहा, असे विधान करून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान आदित्य यांनी यावेळी मित्राने विचारलेला एक किस्सा सांगितला. 18 तारखेला शिबिर, 19 तारखेला वर्धापण दिन आणि 20 तारखेला 50 खोके, बाजूचा फॉरेनर म्हणाला, 50 खोके एकदम ओके, असे बोलत असल्याचा किस्सा आदित्य ठाकरे यांनी सांगितला. तसेच गद्दारांनी खोके खाऊन किंवा स्वत:च्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी आपलं सरकार पाडल्यानंतर देखील मुख्यमंत्री म्हणून कोण उध्दव ठाकरेंचेचे नाव येते, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, महाराष्ट्रातील उद्योजक सांगतात आता जायचे कोणाकडे, भेटायचे कोणाला आणि नक्की गुंतवणूक आणायची कुठून ही माहिती नाही. कारण आता गुंतवणूकीची चर्चा चालत नाही, खोक्यांची चालते,धोक्यांची चालते हे महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Shishir Shinde : ठाकरेंची आणखी एका नेत्याने सोडली साथ, कारणही सांगितलं?

पेग्विन ट्रोलिंगवर काय म्हणाले?

मला खुप वेळा ट्रोलिंग केले जाते पेग्विन पेग्विन, एकतर चालत तसे कोण मला माहित नाही, पण मला ते ट्रोलिंग आवडते, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मी पेग्विन आणले म्हणून मुंबईकर बघू शकले. आता वाघ बघायला कधी मातोश्रीवर येतात, नाहीतर तिथे जातात, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT