'...आता तुला नक्की पाडणार', पुण्यात मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune muralidhar mohol bjp
pune muralidhar mohol bjp
social share
google news

Pune Loksabha : लोकसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर झाली नसली तरीही, देशातील अनेक पक्षांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीमुळे आता भाजपमध्ये (BJP) असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीच्या निमित्तानं भाजपमधील गट-तट आता जाहिरपणे एकमेकांना विरोध करताना दिसून येत आहेत. पुण्याचे माजी महापौर मुरळीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपनेच बॅनरबाजी केल्यामुळे पुण्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यातील भाजपचा पक्षांतर्गत असलेला कलह आता यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारण माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, मात्र त्याचवेळी मोहोळ यांनी भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे. कारण भाजपनेच त्यांच्याविरोधात महानगरपालिकेत बॅनरबाजी केल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> भाजप नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची लोकसभेसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता भाजपमधूनच त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बॅनरवरील आशय

महापालिकेत मोहोळांविरोधात, स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं आता पाडणार' असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यानंतर हे बॅनर्स हटवण्यातही आले आहेत. मात्र या बॅनर्सची आता जोरदार चर्चा पुण्यात होऊ लागली आहे. 

यादी जाहीर होताच विरोध

काही दिवसांपूर्वी भाजपकडून लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत मुरलीधर मोहोळ यांचे नाव दिसून आले. भाजपकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र भाजपमधीलच कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळेच मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीला विरोध केला जात असल्याचीही चर्चा होऊ लागली आहे. 

ADVERTISEMENT

मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात लागलेल्या बॅनरमधून त्यांना थेट आता बास झालं तुला नक्की पाडणार असा थेट इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह हा टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>  फडणवीस दिल्लीत पोहचताच म्हणाले, 'दोन्ही साथीदारांना...'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT