‘गडी काय आहे अजून पाहिलाय कुठं, वयाच्या भानगडीत…’, शरद पवारांचा अजितदादांना भीमटोला

साहिल जोशी

ADVERTISEMENT

Ajit Pawar advised Sharad Pawar to retire from politics as he has completed 83 years of age. To which Sharad Pawar has replied from the public meeting in yeola.
Ajit Pawar advised Sharad Pawar to retire from politics as he has completed 83 years of age. To which Sharad Pawar has replied from the public meeting in yeola.
social share
google news

येवला: ‘काही लोक म्हणले तुमचं वय झालं.. तुम्ही आता निवृत्त व्हा. वय झालंय हे खरंय.. वय 82 झालं हे खरंय.. पण गडी काय आहे ते तू पाहलाय कुठं… अजून तर पत्ताच नाही.. जास्त काही सांगायची गरज नाही.. उगीच वया-बियाच्या भानगडीत पडू नका.. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.’, अतिशय मोजक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) समाचार घेतला. (ajit pawar advised 83 year old sharad pawar retire from politics which sharad pawar replied from public meeting in yeola ncp)

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बैठक बोलावली होती. त्यात ते असं म्हणाले होते की, ‘आता तुमचं 82-83 वय झालं आहे.. तुम्ही आता कुठे थांबणार आहात की नाही…’, म्हणजेच अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या याच विधानावरुन अत्यंत कमी शब्दात शरद पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला.. येवल्यात आयोजित सभेत ते बोलत होते.

‘मोदीजी सगळी सत्ता ही वापरा.. आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा..’

‘एक काळ होता.. ज्या काळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या दुरूस्त केल्या पाहिजे. मध्यंतरी 10-12 देशापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी एक भाषण केलं. त्यांनी भाषणात नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टीका केली. हे करत असताना त्यांनी दुसरे आरोप केले राष्ट्रवादी काँग्रेसवर. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की, जे त्यांनी आरोप केले मग ते आरोप… वेगवेगळ्या प्रकारचे असतील.. ते आरोप भ्रष्टाचाराचे असतील.’

हे वाचलं का?

हे ही वाचा>> BJP: ‘..तर एकनाथ शिंदे आमच्यासोबत आलेच नसते’, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

‘माझं जाहीरपणानं पंतप्रधानांना सांगणं आहे की, तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता ही वापरा.. चौकशी करा.. जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असा तुमचा निष्कर्ष असेल त्याला पाहिजे ती सजा द्या. त्यासाठी आमचा पाठिंबा राहील.’ असं म्हणत शरद पवार यांनी एक प्रकारे थेट पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला आहे.

‘उगीच माझ्या वया-बियाच्या भानगडीत पडू नका.., तुम्हाला महागात पडेल’

‘अनेकांना वाटत होतं की, येवल्याला का जातोय.. तिथे काही तरी वेगळं बोलतील. मी व्यक्तिगत बोलणं हे कधी सांगत नाही..’

ADVERTISEMENT

‘काही लोक म्हणले तुमचं वय झालं.. तुम्ही आता निवृत्त व्हा. वय झालंय हे खरंय.. वय 82 झालं हे खरंय.. पण गडी काय आहे ते तू पाहलाय कुठं… अजून तर पत्ताच नाही.. जास्त काही सांगायची गरज नाही.. उगीच वया-बियाच्या भानगडीत पडू नका.. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. पुन्हा असा विचार कधी करू नका..’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर, मला…’, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट, अजितदादांवर हल्लाबोल

‘धोरणावर टीका करा.. कार्यक्रमावर टीका करा.. पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला कोणी शिकवलेल्या नाहीत. आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलो.. त्या विचारात व्यक्तिगत हल्ले या गोष्टी कधी झाल्या नाहीत. आमची तक्रार एकच आहे. ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेला जे वचन दिलं त्या जनतेच्या विश्वासला तडा बसेल असं पाऊल तुम्ही टाकलं असेल तर ती गोष्टी आम्ही सहन करणार नाही. ती गोष्ट कोणी करत असेल तर त्याला त्याची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल.’ असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT