Ajit Pawar : अजित पवार बारामती सोडणार? कोणाला मिळणार उमेदवारी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar big statement on baramati on maharashtra assembly election 2024 after lots of development work face defeat in lok sabha
बारामतीकर वेगळा निर्णय घेतात तर बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीचा याच पद्धतीने विकास करायचा आहे.

point

पण तुमच्या हातात आहे.

point

मी पण शेवटी माणूस आहे.

Ajit Pawar News : वसंत मोरे, बारामती :  राज्यात अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी सभा, बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यात आता अजित पवारांनी बारामती दौऱ्यात मोठं विधान केले आहे. ''एवढी विकासकामे करूनही जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीलाही वेगळा आमदार मिळाला पाहिजे'', असे विधान करून अजित पवारांनी बारामती (Baramati Vidhan Sabha) सोडण्याची भाषा केली आहे.  त्यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून दुसरा उमेदवार कोण असणार आहे? हे जाणून घेऊयात. (ajit pawar big statement on baramati on maharashtra assembly election 2024 after lots of development work face defeat in lok sabha) 

अजित पवार बारातमीत मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी बारामतीकरांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. ''इथून पुढच्या काळात देखील आपल्याला बारामतीचा याच पद्धतीने विकास करायचा आहे. पण तुमच्या हातात आहे. मी पण शेवटी माणूस आहे. मला पण कधी कधी विचार येतो. एवढी सर्व कामे करून बारामतीकर वेगळा निर्णय देऊ शकतात. तर मग आपण पण आता ते 33, 34  वर्षे झालीत मी तर आता दुसऱ्यांदा खासदार करू शकतो. राज्यसभा दुसऱ्याला दिली. त्याआधी सुनेत्रा पवार यांना दिली. आमदारही दुसऱ्याला केले.पण आता , अशी गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वालाखाची चांगली आहे,असे म्हणत बारामतीकरांवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

हे ही वाचा : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे

 अजित पवार पुढे म्हणाले की, जिथं पिकत तिथं विकत नाही. बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही 1991 ते 2024 ची तुलना करा. असे वक्तव्य अजित पवारांनी करताच समर्थकांनी 'आम्हाला बारामतीत दुसरा आमदार नको' म्हणत 'अजित पवार तुम आगे बढो'  एकच वादा अजित दादा अशा घोषणा देत दादांसमोर सूर धरला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"न सांगता रस्ता होतो. न सांगता पाण्याच्या योजना सुरू होतात. आता कुठल्याही भागात गेला तर रस्ता नाही असं नाही. मेडिकल कॉलेज न मागता मिळतंय.तुम्ही काम लगेच विसरुनच जाता. विकासकामे केली की लगेच काहीजण दुसऱ्या बाजूला टपऱ्या टाकतात, असं काही करु नका. सकाळपासून उठून कामे करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणने काही नाही, जे आहे ते आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

'हा' उमेदवार बारामती लढणार?

अजित पवार हे यंदा आपले पुत्र जय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर अजित पवार बारामती सोडत असतील तर जय पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. तिकडे शरद पवार युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी करतायत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे पुन्हा पवार विरूद्ध पवार लढाई होण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 1500 हातातून गमावून बसाल', 'ही' चूक अजिबात करू नका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT