NCP: ‘सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा…’, प्रचंड बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar faction leader umesh patil criticized supriya sule on ncp party in solapur
ajit pawar faction leader umesh patil criticized supriya sule on ncp party in solapur
social share
google news

Supriya Sule vs Ajit Pawar: सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या काल (11 सप्टेंबर) सोमवारी दिवसभर पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्याचवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सोमवारी सोलापूर शहरात माध्यमांशी संवाद साधत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. ‘खा. सुप्रिया सुळेंचं हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यात हेलपाटे मारू नये. हिंदी, इंग्रजी भाषेचा आधार घेत देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा.’ असा राजकीय सल्ला राष्ट्रवादीच्याच उमेश पाटलांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे. (ajit pawar faction leader umesh patil criticized supriya sule on ncp party in solapur )

ADVERTISEMENT

‘सुप्रिया सुळे या वर्षातील 180 दिवस दिल्लीत असतात, त्यांना दिल्ली महानगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणता आला नाही. महाराष्टात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर पक्षाचा प्रचार केला असता तर देशभरात राष्ट्रवादी पक्ष खूप मोठा झाला असता.’ असे उमेश पाटील यांनी शरद पवार गटातील नेत्यांवर टीका केली.

‘अजितदादा एकटे सक्षम होते’

‘सुप्रिया सुळे या खासदार आहेत. शरद पवार यांच्या सारख्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा होता. इतका मोठा आणि उत्तुंग पाठिंबा असताना सुप्रिया सुळे देशभरात पक्ष वाढवू शकले नाही. याची जबाबदारी झटकून चालणार नाही.’ असंही अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगे पाच अटींवर सोडणार उपोषण, शिंदे सरकार काय करणार?

‘गोवा, मिझोराम, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेशात अजित पवारांनी पक्ष वाढवायला पाहिजे होतं का? अजितदादा एकटे सक्षम होते महाराष्ट्र राज्य सांभाळायला, परुंतु सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र राज्यात घुटमळत राहायचं होतं म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.’ अशी टीकाही उमेश पाटील यांनी केली आहे.

सुप्रिया सुळेंच्या कर्तृत्वावर उमेश पाटलांचे सवाल

‘आम आदमी पार्टी काही वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. आपसारख्या नव्या पक्षाने दोन राज्यात सत्ता स्थापन केली. पण राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्र राज्यात एकहाती सत्ता घेता आली नाही. याला जबाबदार राष्ट्रवादीमधील सर्वच नेते आहेत. खा.सुप्रिया सुळें तर दिल्लीत आहेत त्यांनी दिल्ली महानगरपालिकेत साधं नगरसेवक देखील निवडून आणला नाही. संपूर्ण देशभरात पक्ष वाढवण्याची क्षमता होती. तरीही पक्ष वाढवला नाही. सुप्रिया सुळेंच कर्तृत्व असताना त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी वाढवण्यासाठी वेळ दिला नाही.’ असं म्हणत उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळेंना टार्गेट केलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sanatan Dharma: ‘सनातनवर बोलाल तर जीभ हासडून, डोळे काढीन,; केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

‘पवार कुटुंबात पक्ष वाढीसाठी वाटण्या व्हायला पाहिजे होत्या’

‘राष्ट्रवादी पक्षात संभ्रम निर्माण करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी लुडबुड केली. शरद पवार यांसारखा राष्ट्रीय व खंबीर नेतृत्व घरात असताना पक्ष वाढला नाही. पवार फॅमिलीत पक्ष वाढवण्यासाठी वाटण्या झाल्या असत्या तर अजित पवारांना सत्तेत जाण्याची किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची वेळच आली नसती. यांना फक्त पायात पाय घालायचा होता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडली.’ अशी टीकाही उमेश पाटील यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT