Ajit Pawar भाजपसोबत हा अमित शाहांचा प्लॅन? एका वाक्याने मोठा खुलासा

ADVERTISEMENT

ajit pawar go with bjp this amit shah plan to big reveal in one sentence
ajit pawar go with bjp this amit shah plan to big reveal in one sentence
social share
google news

Ajit Pawar and Amit Shah: मुंबई: ‘मी तर काही पत्रकारांना म्हटलं तुम्हाला काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का..?’ हे वाक्य आहे अजित पवार (Ajit Pawar) यांचं 18 एप्रिल 2023 चं, त्यावेळेस अजित पवार महाविकास आघाडीमध्ये (MVA) होते. त्याच्या काही दिवसांनंतर म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी याच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यासरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत शरद पवार आले नाहीत मात्र राष्ट्रवादीतील अनेक महत्त्वाचे नेते आले. या सगळ्यामागे भाजपचे बडे नेते असल्याचं अनेकांनी म्हटलं पण खरं कारण समोर आलं ते महिनाभरानंतर… (ajit Pawar go with bjp this amit shah plan to Big reveal in one sentence)

6 ऑगस्ट रोजी अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्यांसोबत स्टेज शेअर केला अजित पवार यांनी… अजित पवार यांच्यासमोर अमित शाह (Amit Shah) यांनी वापरलेलं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, हेच वाक्य नेमकं काय आहे आणि त्या वाक्याचा अर्थ काय निघू शकतो हे आपण जाणून घेऊया.

‘एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आपल्या मागे महाशक्तीचा पाठिंबा आहे.’ असं वाक्य कधी तुम्ही ऐकलं असेल, ती महाशक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भाजप होती, हे काही दिवसांनी स्पष्ट झालं. अशात एका वर्षानंतर अजित पवारांनी बंड केलं.. त्या बंडामागे नेमकं कोण होतं, हेही आता स्पष्ट झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विषयाच्या सुरुवातीलाच अमित शाह म्हणाले की, ‘अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा आले आहेत आणि मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच मंचावर कार्यक्रमात सहभागी झालो आहे. तर मी दादांना एक गोष्ट सांगतो की… खूप काळानंतर तुम्ही योग्य जागी बसले आहात. हीच जागा योग्य होती.. पण आपण बराच उशीर केला..’

हे ही वाचा >> No Confidence Motion : राहुल गांधी पुन्हा खासदार, PM मोदींचं टेन्शन वाढणार?

अमित शाहांनी हे भाषण करुन अजित पवारांच्या बंडामागे स्वत: असल्याचे संकेत दिले. हीच जागा तुमच्यासाठी होती मात्र यायला खूप उशीर केला, असं मत शाहांनी मांडलं.

ADVERTISEMENT

या वाक्यामुळे अजित पवार यांना आपल्याकडे घेण्यासाठी नेमके कधीपासून प्रयत्न सुरु होते? असा सवाल उपस्थित होतोय. अमित शाहांच्या या वाक्यामुळे शहांकडूनच दादांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरु होता का? अशा चर्चाही होऊ लागल्या आहेत.

ADVERTISEMENT

 

हा VIDEO पाहा >>  अजित पवार – अमित शाह यांच्यात आधीपासूनच खलबतं? ‘त्या’ वाक्यावरुन खुलासा

अमित शाहांच्या या भाषणाआधी अजित दादांनी भाषण केलं, त्यामध्ये अजितदादा नेमकं काय म्हणाले होते की, ‘अमितभाई हे गुजरातमधील आहेत.. पण त्यांचं बरंच प्रेम हे महाराष्ट्रावर आहे. त्याचं कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावई आहेत. तुम्ही माना अथवा नका मानू प्रत्येक जावयाला सासरवाडीबाबत जास्त प्रेम असतंच. तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की, अनेकांना असा प्रश्न पडतो की, अजित पवारांनी असा का निर्णय घेतला.. हे करण्याचं धाडस फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाह साहेब यांच्यात आहेत. तेच तुमच्या-माझ्या देशाला नेतृत्व देऊ शकतात..’

हे ही वाचा >> Delhi Ordinance Bill: ‘आपके आँखो की शरम तक आपने बेची है..’, संजय राऊत राज्यसभेत का भडकले?

अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, अचानक दादांनी भाजपसोबत जाऊन घेतलेली शपथ, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींकडून दादांनी मिळालेली कौतुकाची थाप आणि आता अमित शाहांकडून दादांचं झालेलं कौतुक, या सगळ्यावरुन खूप दिवसांपासूनच दादा आणि शाहांमध्ये चर्चा सुरु होती, हे नक्की होतंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT