Ajit Pawar: 'शरद पवार म्हणतात मला...' यावर अजितदादा काय म्हणाले?

मुंबई तक

Ajit Pawar Reaction on Sharad Pawar: शरद पवार यांनी लोणावळ्यात आमदार सुनील शेळकेंबाबत जे विधान केलं त्यावर बोलताना अजित पवार यांनी अगदी सावध पवित्रा घेतला आहे. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या त्या विधानावर अजित पवार काय म्हणाले?
शरद पवारांच्या त्या विधानावर अजित पवार काय म्हणाले?
social share
google news

Ajit Pawar: भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणावळ्यात बोलताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि अप्रत्यक्षपणे अजितदादांना थेट इशारा दिला होता की, दमदाटी केलं तर मी देखील सोडणार नाही. याचबाबत अजित पवार यांना जेव्हा पत्रकारांनी सवाल विचारला तेव्हा त्यांनी अगदीच सावध भूमिका घेतली. (Ajit Pawar has taken a very cautious stance while talking about Sharad Pawar's statement )

अजित पवार हे एका कार्यक्रमानिमित्त भंडाऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांना शरद पवार यांनी लोणावळ्यात केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आलं. मात्र, त्यावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी सुनील शेळकेकडून माहिती घेतो असं म्हणत अजित पवारांनी सावध पवित्रा यावेळी घेतला आहे. 

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले...

'मला याबद्दलचं काही माहिती नाही.. मी पहिल्यांदा सुनील शेळकेकडून.. विधिमंडळातला आमदार आहे तो.. त्याच्याकडून माहिती घेईल. एक गोष्टींचा विपर्यास केला जातो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. मी अजून सुनीलशी बोललेलो नाही. मी माहिती घेईन आणि त्याबद्दल माझं मत देईल.'

'आता मध्येच आम्ही एक बातमी वाचली की, सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं. काय जेवण झालं नाही, काही नाही.. कारण मी आणि देवेंद्र रात्री बरोबरच होतो. इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp