Ajit Pawar : ”माझ्या डोळ्यादेखत अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Katewadi Gram Panchayat Elections : राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या काटेवाडी ग्राम पंचायतीतही मतदान सुरु आहे. या निवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) मातोश्री आशा पवार (Asha Pawar) मतदान करण्यासाठी काटेवाडीतील मतदान केंद्रावर आल्या होत्या. यावेळी ”माझ्या देखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं” अशी इच्छा आशा पवार यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे. (ajit pawar mother asha pawar i want to see my son become chief minister katewadi gram panchayat election)

काटेवाडी ग्राम पंचायतीच्या निवडणूकीच्या मतदानाला अजित पवार येऊ शकले नाहीत. त्यांना काही दिवसांपूर्वीच डेंग्यूचा आजार झाला होता. या आजारामुळे त्यांच्या अंगात अशक्तपणा असल्यामुळे ते अनुपस्थित होते.तर त्यांच्या जागी अजितदादाच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार सकाळी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आशा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  हे ही वाचा : गजानन कीर्तिकरांचा पत्ता कट! रामदास कदमांनी जाहीर केलं उमेदवाराचं नाव

प्रसिद्धी माध्यमांनी यावेळी आशा पवार यांना अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावेळी आशा पवार म्हणाल्या, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं, असे वाटते. दादावर लोकांच प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. आता शेवटचे आहे, मी आता 86 वर्षांची आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे,असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पुर्ण होईल की नाही, असे आशा पवार यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच दादा आजारी आहे. त्याला अशक्तपणा आलाय. त्यामुळे तो मतदानाला आला नाही. मी 1957 सालापासून मतदान करतेय. यंदा मतदानासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही आशा पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : Crime : भयंकर! भाजप नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करून शरीराचे केले तुकडे तुकडे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT