मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसले अजित पवार; नार्वेकरांनी काय केले?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

ajit pawar sat on cm eknath shinde's chair after rahul narvekar request
ajit pawar sat on cm eknath shinde's chair after rahul narvekar request
social share
google news

Maharashtra politics : एकीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांचा अपात्रतेचा प्रलंबित असलेला निर्णय… दुसरीकडे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा… यातच गुरुवारी (3 ऑगस्ट) मुंबईत एक मजेशीर राजकीय प्रसंग घडला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसवलं. खुर्चीचा हा किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.

ADVERTISEMENT

झालं असं की मुंबईतील नरिमन पाईंट परिसरात आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन गुरूवारी झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित राहणार होते. पण, ते या कार्यक्रमाला आलेच नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही मनोरा आमदार निवास भूमिपूजन कार्यक्रमाचा समावेश नव्हता.

वाचा >> “शरद पवारांनी, ब्रेकअप स्टंट करून जनतेला मुर्ख बनवू नये”, प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहातच दिली होती. त्यामुळे व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही खुर्ची ठेवण्यात आली होती.

हे वाचलं का?

नार्वेकरांनी अजित पवारांना बसवलं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या शेजारी विधानसभा अध्यक्षांची खुर्ची होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. यावेळी एकनाथ शिंदे कार्यक्रमाला न आल्यामुळे खुर्ची रिकामी होती. राहुल नार्वेकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. मात्र, अजित पवारांनी नकार दिला. पण, राहुल नार्वेकरांनी आग्रह केल्याने अजित पवार त्या खुर्चीवर बसले. अजित पवार बसत असतानाच राहुल नार्वेकरांनी खुर्चीवर लावलेलं एकनाथ शिंदेंच्या नावाचं स्टिकर काढलं आणि त्याची घडी केली.

वाचा >> मविआ वज्रमुठ पुन्हा आवळणार, बैठकीत काय ठरलं?

हे सगळं घडत असताना व्यासपीठासमोर बसलेले लोक राहुल नार्वेकर यांच्याकडे बघत होते. ही बाब राहुल नार्वेकरांच्या लक्षात आल्यानंतर ते हसले. यावेळी बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस हे सगळं बघत होते, त्यांनीही स्मितहास्य करत यावर प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

असा असेल मनोरा आमदार निवास

-नरिमन पॉइंट परिसरातील ‘मनोरा’ आमदार निवासाची पुनर्बांधणी केली जाणार.

ADVERTISEMENT

-प्रत्येकी 40 व 28 मजल्यांच्या दोन इमारती उभारल्या जाणार.

-सुमारे चार वर्षे काम रखडल्याने या आमदार निवासाच्या प्रकल्पाचा खर्च जवळपास 400 कोटींनी वाढला.

– अंदाजे 1200 कोटी खर्चून विधानसभेच्या 288, तर विधान परिषदेच्या 78 अशा एकूण 368 आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था केली जाणार.

– प्रत्येक आमदारासाठी एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाईल.

– ‘लार्सन अँड टुब्रो’ ही बांधकाम कंपनी हा नवीन आमदार निवास बांधणार आहे.

– 13 हजार 429 चौरस मीटर क्षेत्रफळाचा (साडेतीन एकर) हा भूखंड आहे.

– या इमारतीच्या प्रत्येक सदनिकेत स्वयंपाक घर, प्रत्येक मजल्यावर बहुउपयोगी सभागृह असेल.

– तसेच अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकाचे दुकान, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सुविधा असतील.

– मनोरा आमदार निवासस्थान पाडल्याने मुंबईबाहेरील आमदारांना निवासस्थानासाठी दरमहा एक लाख रुपये सरकारकडून दिले जातात.

– त्यातून सरकारच्या तिजोरीवर वर्षांला १०० कोटींचा बोजा पडतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT