Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत
अजित पवारांसोबत गुप्त बैठकीचा सवाल पत्रकारांनी विचारला होता.या बैठकीवर शरद पवार म्हणाले, अजित पवार हा माझा पुतण्या आहे.कुटुंबातील व्यक्तीने वडिल माणसाला भेटण्यात गैर काय?, असा उलट सवाल त्यांनी केला.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शनिवारी गुप्त बैठक पार पडली. पुण्यातील कोरेगाव पार्कातील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली होती. या बैठकीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता स्वत: शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे.कुटुंबातील व्यक्तीने वडिल माणसाला भेटण्यात गैर काय? असा प्रतिसवाल शरद पवार यांनी माध्यमांना केला आहे. (ajit pawar secret meeting in pune sharad pawar reaction maharshtra politics)
ADVERTISEMENT
शरद पवार हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अजित पवारांसोबत गुप्त बैठकीचा सवाल पत्रकारांनी विचारला होता.या बैठकीवर शरद पवार म्हणाले, अजित पवार हा माझा पुतण्या आहे.कुटुंबातील व्यक्तीने वडिल माणसाला भेटण्यात गैर काय?, असा उलट सवाल त्यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती, या नोटीसीला मी राष्ट्रवादीत फुट पडली नसल्याचे उत्तर दिले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. पण आम्ही कुणीही भाजपसोबत नाही आहोत.आमच्यातल्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. या भूमिकेत काही बदल होईल का?असा प्रश्न काही हितचिंतकांना आहे, त्यामुळेच ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.असे असले तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो, राष्ट्रवादी पक्ष भाजपासोबत जाणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.ॉ
हे ही वाचा : शरद पवार-अजित पवारांची भेट; जयंत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीत फूट नाही, कारण…’
काही लोक येतात. काही लोक दुखी आहेत, त्यांना असे वाटतं की, जे झालं ते चुकीचे झालं आहे. आमच्याकडूने ते झाले नसते तर बरं झालं असतं. असं काहींच म्हणण आहे. हे नेते थेट येऊन बोलत नाही, पण कुणाच्या माध्यमातून सांगत असतात. झालं गेते ते संभाळून घ्या, असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
इंडियाच्या बैठकीवर काय म्हणाले?
31 ऑगस्टला मुंबईत अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. आणि 1 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये सर्व विरोधी नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षाचे 30 ते 40 नेते उपस्थित राहणार आहेत. ही बैठक मी स्वत:, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आयोजित केली आहे. या बैठकीचे निमंत्रण आमच्या तिघांकडून देण्यात आले आहे.
गेल्या दोन बैठकीत चर्चा झाल्या आताच्या बैठकीत उद्याची निती ठरवण्याची गरज आहे.त्यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.इंडियाला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. फोडाफोडीचे राजकारण करून सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करतोय.जनतेच्या ते पसंती पडत नाही आहे. याचे परीणाम निवडणूकीच्या वेळेस दिसून येतील, असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Kalwa Hospital : 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? रुग्णालय प्रशासनाने सांगितली कारणे
पंतप्रधान मोदींवर टीका
मणिपूरचा प्रश्न देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ईशान्य हा संवेदनशील भाग आहे. पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जे उत्तर दिले, अडीच तास की पावने तीन तास नक्की माहिती नाही, त्या उत्तरामध्ये मणिपूरचा उल्लेख नीट केला नाही. तसेच त्यांच्या भाषणात राजकीय प्रश्न, लोकांचे प्रश्न या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नव्हते.राजकीय हल्ले कसे करता येतील अशी त्यांनी भूमिका मांडली. देशाच्या दृष्टीकोनातून ही भूमिका योग्य नव्हती, अशी टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT