Inside Story: शरद पवारांना दाखवला कात्रजचा घाट, अजितदादांनी 30 जूनलाच कसा साधला डाव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar sworn dcm on july 2 rebel against uncle ncp chief sharad pawar know inside story june 30 praful patel latest news of maharashtra politics
ajit pawar sworn dcm on july 2 rebel against uncle ncp chief sharad pawar know inside story june 30 praful patel latest news of maharashtra politics
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2 जुलै 2023 रोजी आपल्या आठ आमदारांसह थेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारण मोठी खळबळ माजली होती. आजवर आपल्या राजकीय विरोधकांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक वेगवेगळ्या खेळीने कात्रजचा घाट (Katraj Ghat) दाखवल्या होता. मात्र, यावेळी आपल्या राजकीय कारकीर्दीला वळण देताना अजित पवार यांनीच आपल्या काकांना यावेळी कात्रजचा घाट दाखवला. ते देखील चक्क शपथविधीच्या दोन दिवस आधीच. (ajit pawar sworn dcm on july 2 rebel against uncle ncp chief sharad pawar know inside story june 30 praful patel latest news of maharashtra politics)

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण हे सारं काही एका दिवसात घडून आलं नाही. तर गेले अनेक दिवस व्यवस्थिती रणनिती आखण्यात आली होती. ज्याची खरी अंमलबजावणी ही 30 जूनलाच करण्यात आली होती. सर्वात आधी 30 जून रोजी अजित पवारांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे आपल्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची अतिशय गुप्तपणे बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तसंच विधीमंडळ नेता म्हणूनही निवड करण्यात आली. याशिवाय याच दिवशी निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा करणारा अर्जही त्यांनी त्याच दिवशी पाठवला होता. पण या सगळ्याबाबत त्यांनी कोणालाही कुणकुण लागू दिली नव्हती.

आता या सगळ्याबाबत विशेषत: 30 जूनच्या बैठकीबाबत आणि त्यानंतर काय-काय करण्यात आलं याविषयी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी अगदी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

पाहा प्रफुल पटेल 30 जूनच्या बैठकीबाबत काय-काय म्हणाले:

‘आमच्याबाबत संभ्रम आणि काही चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगण्यासाठी आपल्या समोर आलो आहोत.’

’30 जून 2023 रोजी या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत अनेक लोकं उपस्थित होते. ही बैठक देविगरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार तिथे उपस्थित होते दोन्ही सभागृहाचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्या 30 तारखेच्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते, अजित पवार आपला नेता म्हणून तिथे निवडलं. त्यामुळे अजित पवार यांनी दोन-तीन प्रक्रिया नंतर केली. पहिली गोष्ट ही की.. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सूचित केलं की.. नाही पहिली प्रक्रिया ही होती की, त्यांनी प्रफुल पटेल म्हणजे मी.. मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना मी अजित पवार आमचे विधीमंडळाचे नेते आहेत असं मी त्यांना कळवलं. तसेच आम्ही पक्ष म्हणून अनिल भाईदास पाटील यांना प्रतोद म्हणून माझ्या सहीद्वारे नियुक्त केलं. त्याचबरोबर आम्ही विधानपरिषदेच्या सभापतींनाही कळवलं की, अमोल मिटकरी हे आमचे विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्त केलं आहे.’

‘महत्त्वाची बाब ही आहे की, आम्ही त्याच दिवशी 30 तारखेला बहुतांश म्हणजे 40 वर आम्ही आमदारांचे आणि अनेक मान्यवरांच्या अॅफिडेव्हिडसह केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीमध्ये आमच्या अर्ज अजित पवारांच्या नावे दाखल केला आहे.’

ADVERTISEMENT

‘म्हणजे 30 तारखेपासून हा विषय जो आपण आज चर्चा करत आहोत ते निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांकडे हा विषय पोहचला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. पक्ष म्हणून नाव आणि चिन्ह आम्हाला मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही केली आहे.’

‘कृपया करुन आपल्या सर्वांना कळवू इच्छितो की, ही फूट नाही. कुठेही वेगळी कारवाई नाही.. हा सरळसरळ पक्षाचं बहुमत हे अजित पवारांच्या मागे उभी आहे. असं आम्ही निवडणूक आयोगाला अर्जाद्वारे 30 तारखेलाच कळवलं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अतं, तिसऱ्या मजल्यारून…

‘काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्याला मी दुसरं काही नाव देणार नाही. ती राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत बैठक नव्हती.’

‘आमच्या पक्षाची जी घटना आहे त्याचे काही नियम आहेत. या घटनेनुसार सगळी प्रक्रिया म्हणजे वरपासून खालपर्यंत एका पिरॅमिडप्रमाणे असतं. पक्षाच्या घटनेत स्पष्टपणे म्हटलं आहे की, पक्षाची निवडणूक ही खालपासून वरपर्यंत करणं गरजेचं आहे. यामध्ये जे मी म्हणतोय की, नेमणुकीचा अधिकारच नाही.’

‘मी तुम्हाला एक सांगतो… आमची सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं, आता हे अधिवेशन तेव्हाच होते जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते. नंतरच राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन होऊ शकते. कारण त्या अधिवेशनाला जाणारा व्यक्ती पहिले इथून निवडून गेला पाहिजे ना.. ही तांत्रिक गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे.’

‘म्हणून काल जी बैठक झाली आणि सप्टेंबर 2022 मध्ये जे अधिवेशन.. आता हे अधिवेशन झालं तरी ते खुलं अधिवेशन होते. आमाच्या राज्याची निवडणुकीची प्रक्रिया अजून सुरू झाली. दोन-तीन जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे. अद्याप महाराष्ट्राचीच निवडणूक झालेली नाही. समीक्षा बैठका व्हायच्या पण प्रक्रिया कुठेही पोहचलेली नाही. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नेमले आहेत.. पण त्यासाठी कोणतीही निवडणूक झालेली नाही. आमचं संघटनात्मक रचना हे योग्य पद्धतीने झालेलं नाही.’

हे ही वाचा>> ‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका

‘पक्षाबाबत जो काही पेच निर्माण झाला आहे त्याबाबत फक्त निवडणूक आयोगच निर्णय घेऊ शकतं. म्हणून निवडणूक आयोगाकडे अजित पवारांनी याचिका दाखल केली आहे.’

‘जयंत पाटील यांनी अजित पवार आणि इतर आठ जणांबाबत अपात्रतेची नोटीस बजावली आहे. पण जयंत पाटीलच आमच्या पक्षाचे प्रदेशाध्य आहेत का? जर ते आमच्या पक्ष घटनेनुसार अध्यक्ष नाहीत तर त्यांनी कोणत्या आधारे अपात्रतेची नोटीस बजावली आहे?’ अशी सविस्तर माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT