Maharashtra Weather: आजही बरसणार पाऊस, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 28 ऑक्टोबर रोजी राज्यात कसा असेल हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार
राज्यातील काही ठिकाणी पावसाची परिस्थिती कायम
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घेऊया 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान विभागाच्या एकूण परिस्थितीबाबतची महत्त्वाची अपडेट.
हे ही वाचा : महिलेचा शारिरीक छळ, साताऱ्यातील विवाहितेनं घेतला गळफास, शवविच्छेदनाच्या अहवालाबाबत आईचा धक्कादायक दावा
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. या विभागातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच याच भागांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, सांगली आणि सोलापूरात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज जारी केला आहे.










