Maharashtra Assembly Election : अजित पवारांचं ठरलं! बारामतीतून विधानसभा लढणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar to contest baramati vidhan sabha election big statement the candidate is your favorate maharashtra assemblye elction 2024
अजित पवार विधानसभा बारामतीतूनच लढणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले

point

'बारामतीवर लोकं मतं मागतात, आपण कुणावर मागायची'

point

तुम्हाला ऋणानुबंध जपावे लागतील घड्याळाचं बटण दाबून

Ajit Pawar : गेल्या काही आठड्यापुर्वी झालेल्या सभेत अजित पवारांनी बारामतीतून माघार घेत असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर आता अजित पवारांनी पलटी मारल्याचे बोलले जात आहे. कारण अजित पवारांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.  ''बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल'', असे म्हणत अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढवणार हे अप्रत्यक्षरीत्या आज जाहीर केले. (ajit pawar to contest baramati vidhan sabha election big statement the candidate is your favorate maharashtra assemblye elction 2024)

ADVERTISEMENT

बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने बारामतीत आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाषणामध्ये अनेकदा घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून उमेदवाराला विजयी करा असा उल्लेख केला. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आपण आपली उमेदवारी जाहीर करा, असा आग्रह धरला. आणि आम्हाला तुम्हीच उमेदवार म्हणून हवे आहात असे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?

कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून अखेर अजित पवार म्हणाले की, ''बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल''. यानंतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडला होता. 

हे वाचलं का?

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार, त्यांच्या ऐवजी इतर कोणीतरी उमेदवार असणार अशा प्रकारची चर्चा होती. या चर्चांना आज अखेर अजित पवार यांनीच एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे. 

हे ही वाचा : Suraj Chavan: मंदिरातले नैवेद्य खाऊन काढले दिवस अन् बिग बॉस जिंकताच नशीब उजाडलं, केदार शिंदेंची मोठी घोषणा! 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT