अजित पवार राष्ट्रवादी सोडणार? गुलाबराव पाटलाचं मोठं विधान, म्हणाले, ‘हे’ अटळ’

मुंबई तक

ADVERTISEMENT

gulabrao patil reaction on ajit pawar join hands bjp
gulabrao patil reaction on ajit pawar join hands bjp
social share
google news

Gulabrao Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्य़ा 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचीही सुत्रांची माहिती आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता शिंदेच्या एका मंत्र्यान थेट पक्षांतर अटळ असल्याचे मत मांडले आहे. राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण दिसून आले असून अजित पवारांच पक्षांतर अटळ आहे. भाजप-शिवसेनेच्या पावसामध्ये ते ढगाळ वातावरण मिक्स होईल, असे चित्र दिसतेय, असे सूचक विधान कॅबिनेट मंत्री आणि गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पत्रकारांशी बोलत होते.(ajit pawars defection is inevitable gulabrao patil reaction on ajit pawar join hands bjp)

ADVERTISEMENT

ही चर्चा नुसती चर्चा नाहीए. ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक नाहीयेत, त्यांची चर्चा गल्ली कट्यावर करताय, ही महाराष्ट्रात चर्चा होतेय आणि त्यामध्ये तथ्य असल्याचे देखील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नमूद केले. तसेच मला असे वाटते चर्चा संपेल आणि पक्षांतर होईल. राजकीय भूकंपापेक्षा महाभूकंप होईल आणि या बदलानंतर राज्यातले चित्र देखील वेगळे असेल,असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Ajit Pawar भाजपासोबत जाणार? राष्ट्रवादीतील ‘त्या’ आमदारांची भूमिका काय?

काही लोक नुसत पक्षांतर सत्ते करीता करत नाही, तर विकासाकरीता करतात. अजित दादा दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. आम्ही त्यांच्याबरोबर अडिच वर्ष काम केले आहे. स्पष्ट बोलणारा नेता आहे आणि अशा नेत्याची प्रत्येक पक्षाला गरज असल्याचेही मत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मांडले.

हे वाचलं का?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बोलण्यावर मी काय बोलणार ते खुप मोठे आहेत. ते जे बोलतात त्याच्या विरूद्द गोष्टी घडतात, असे देखील पाटील म्हणाले आहे. सध्या राज्यात 40 फार लढले आहेत, आता बघू कधी पाऊस पडतोय,अशी उत्सुकता देखी पाटील यांनी ताणून ठेवली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

तुम्ही सर्व चॅनेलवाले एक युनिट अजितदादांच्या मागे लावा. एक कार्यक्रम रद्द केल्यानंतर असे काही होत नाही,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती. अजित दादांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही गोष्ट दादांना विचारा, माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खुप कामे आहेत. त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP फुटणार?: शरद पवारांनी अजित पवारांचा विषयच संपवला, म्हणाले…

य़ाआधी देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत जयंत पाटीलही बोलले नव्हते, त्यामुळे ते रागावले आहेत असे म्हणता येईल का? असे त्यांनी सांगितले होते. महाविकास आघाडीच्या प्रत्येक रॅलीत फक्त दोनच लोक बोलायचे हे आधीच ठरले होते. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या या सर्व अफवा आहेत. ज्या झाडांना जास्त फळे येतात, त्या झाडांवरच दगड मारला जातो, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT