Assembly elections 2023 exit polls : काँग्रेस-भाजप की अन्य; एक्झिट पोलमध्ये कुणाला कौल?
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये सत्ताधाऱ्यांना कौल की, विरोधकांना मिळणार सत्तेची सूत्रे? पहा पाच राज्यातील एक्झिट पोलचे निकाल…
ADVERTISEMENT
Exit Poll Results of all five states (Madhya Pradesh, Rajasthan, Telangana, Chhattisgarh and Mizoram) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील एक्झिट पोल ३० नोव्हेंबर रोजी समोर येतील.
ADVERTISEMENT
सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं, मात्र ज्योतिरादित्य शिंदेंसह काही आमदार भाजपत गेले आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. त्यानंतर भाजपने शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनता यावेळी कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मिझोराम आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारं आहेत. तेलंगणा काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, त्यामुळे येथील निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT