Baba Siddique : मुंबईत काँग्रेसला दुसरा झटका बसणार! माजी मंत्री अजित पवारांच्या गळाला
baba siddique zeeshan siddique : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होऊ शकतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे.
ADVERTISEMENT

Baba Siddique Ajit Pawar News : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची न्याय यात्रा सुरू झाली, त्याच दिवशी मुंबईतील काँग्रेसचा एक नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाला. आता राहुल गांधी मुंबईत पोहोचण्यापूर्वी काँग्रेसला दुसरा झटका बसणार आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार गटातील नेत्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. (Congress leader Baba Siddiqui will join NCP ( Ajit Pawar ) faction next week, confirms NCP leaders)
मिलिंद देवरा हे काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबई काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होणार असल्याची माहिती आहे.
अजित पवारांना का हवाय मुस्लीम चेहरा?
बाबा सिद्दीकी यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवारांना सिद्दीकींची गरज का पडली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यामागे मुंबईत पक्षाला मुस्लीम चेहरा हवा, असं कारण सांगितलं जात आहे.
हेही वाचा >> “लायकी काढता, ‘खुटा उपटण्याची’ भाषा करता..”, भुजबळ जरांगेंवर एवढे का संतापले?
आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती, मात्र अधिवेशन काळात त्यांच्या सत्ताधारी बाकावरील हजेरी अनुत्तरीत प्रश्नांची उकल झाली. मात्र, यावरून भाजपवर टीका झाली आणि भाजपने मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत मुस्लीम चेहऱ्याची गरज निर्माण झाली होती, असं सांगितलं जात आहे.