Badlapur Case: 'उद्धव ठाकरेंना इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण...', फडणवीस ठाकरेंवर का संतापले?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

'उद्धव ठाकरेंना इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण शोभत नाही'
'उद्धव ठाकरेंना इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण शोभत नाही'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरची घटनेच्या चौकशीसाठी आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी

point

बदलापूरची घटनेच्या चौकशीसाठी आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी

point

बदलापूर प्रकरणावरून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

Badlapur school case: बदलापूर: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता राजकीय वार-प्रतिवार देखील सुरू झाले आहेत. बदलापूरवरील घटनेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. (badlapur case doing politics at such a low level does not suit uddhav thackeray why did devendra fadnavis get angry with uddhav thackeray)

ADVERTISEMENT

बदलापूर घटनेवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. जी घटना झालेली आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे. शाळेतील दोन अतिशय लहान मुलींना त्याठिकाणच्या सफाई कर्मचाऱ्याने त्याने ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ते अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेकही जनतेमध्ये पाहायला मिळतोय. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतलेली आहे. या संदर्भात तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग ज्या आयजी स्तरावरच्या अधिकारी आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे.'

हे ही वाचा>> Badlapur News : ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', CM शिंदेंच्या नेत्याची मुजोरी

'महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशी भावना या मागे आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यासंदर्भात जी कारवाई तातडीनं केली पाहिजे तीसुद्धा केली जात आहे. यासंदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल असे निर्देश दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवलेला आहे. कुठल्याही स्थितीत अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी असा प्रयत्न राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा असेल. त्यासाठी जी कारवाई करण्याची गरज आहे त्याची सुरुवात वेगाने करण्यात आली आहे.' 

हे वाचलं का?

'मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला की कसा यावर कमेंट करणं मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो. पण त्याठिकाणी जी काही मागणी होतेय की, तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार तातडीनं जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जात आहे. मला असं वाटतं की ज्या संवेदनशीलतेनं काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे.' 

'घटना उघडकीस आल्यावर तात्काळ कारवाई झाली आहे. तथापि कुणी जाणीवपूर्वक दिरंगाई केली आहे का? कुणी लपवून ठेवलं आहे का? यासंदर्भातही चौकशी ही जी एसआयटी आपण केलेली आहे ती करेल. जर कुणी दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक एफआयआर लाँच करायला उशीर केला असेल तर असं काही असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. चौकशी वेगानं केली जाईल. आम्हाला तात्काळ चार्जशीट दाखल करुन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायची आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Badlapur School case चा FIR आला समोर, घटना वाचून तुमच्याही डोक्यात जाईल सणक

'असं आहे की, मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्या संवेदना बोथट झाल्यात असा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. किमान अशा घटना घडतात तेव्हा राजकारण करायचं नसतं. यांच्या मनामध्ये केवळ राजकारण आहे ते आता त्यांच्या मनातून बाहेर येतंय.'  

ADVERTISEMENT

'मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीनं इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात ते राजकीय न वागता, जनतेला कसा दिलासा देता येईल आणि अशा प्रकरणात न्याय कसा देता येईल अशा प्रकारच्या सूचना करायच्या असतात. पण सुप्रियाताई किंवा उद्धव ठाकरेंना केवळ राजकारण करायचं आहे. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूर प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी दिले आहेत. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT