Badlapur News : ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', CM शिंदेंच्या नेत्याची मुजोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

 badlapur news female reporter allegation on shiv sena leader vaman mhatre badlapur school case news
महिला पत्रकारासोबत शिंदेंच्या नेत्याची अर्वाच्च भाषा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला पत्रकारासोबत शिंदेंच्या नेत्याची अर्वाच्च भाषा

point

महिला पत्रकाराचा शिंदेंच्या नेत्यावर आरोप

point

विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा उचलून धरलाय

Badlapur News : बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज नागरीक रस्त्यावर उतरले होते. रस्ते, रेल्वे आणि घटनास्थळ म्हणजेच शाळेत घूसून नागरीकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे वार्ताकन करत असताना सकाळच्या एका महिला पत्रकारासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याची घटना घडली आहे.. ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', अशी अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप महिला पत्रकाराने वामन म्हात्रेंवर केला आहे. या आरोपानंतर आता वामन म्हात्रेंवर टीका होत आहेत. तसेच विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा उचलून धरलाय. (badlapur news female reporter allegation on shiv sena leader vaman mhatre badlapur school case news)

ADVERTISEMENT

सकाळची एक महिला पत्रकार बदलापूर अत्याचार प्रकरणाच वार्ताकन करत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदेच्या सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'' अशी अर्वाच्च भाषा वापरली होती. या प्रकरणी आता महिला पत्रकाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणी आता विरोधकांनी देखील वामन म्हात्रेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा :Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!

पत्रकाराचे काम हे सत्य रिपोर्ट करणे.सकाळ वृत्तपत्रात प्रतिनिधी असलेल्या मोहिनी जाधव या पोलिस स्थानकात बदलापूर घटनेचे वार्तांकन करायला गेले असताना त्यांना शिंदे गटाच्या ह्या पदाधिकाऱ्याने धमकी दिली.आमच्या माता भगिनी सुरक्षित आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यावर सकाळपासून काय कारवाई केली? पक्षातून निलंबित केले का? याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

हे वाचलं का?

महिला पत्रकाराच्या आरोपावर म्हात्रे काय म्हणाले? 

महिला पत्रकाराने केलेल्या आरोपावर आता वामन म्हात्रे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महिला पत्रकाराची स्टंटबाजी आहे. मोहिनी जाधव चांगल्या परिचयाची पत्रकार आहे. पण ती एका राजकीय पक्षाचं शिवसेना (UBT) चं काम करते. मी तिला विचारलं की, तुम्ही 2-3 दिवसापासून या बातम्यांचं कव्हरेज केलं. मुलीवर बलात्कार झाला की नाही झाला याची शहानिशा करून तुम्ही ते सांगायला पाहिजे. तसेच मी कुठच्याही प्रकारचं घाणेरडं वाक्य हे त्या महिला पत्रकाराला बोललो नाही. तिने स्टंटबाजीसाठी हे स्वत:वर ओढावून घेतले असल्याचे वामन म्हात्रे यांनी म्हटले आहे. 

मी कुठल्याही अश्लील भाषेत पत्रकार मोहिनी जाधव हिच्याशी बोललो नाही. वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहरप्रमुख आहे. माझ्याकडून आतापर्यंत अशी चूक झालेली नाही आणि  भविष्यातही होणार नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Bharat Bandh : उद्या 'भारत बंद', नेमकं घडलंय तरी काय?

माझ्या माहितीनुसार हे आंदोलन मनसेच्या संगीता चंदवनकर यांनी आयोजित केलं होतं. याच चंदवनकर यांनी उद्धव साहेबांच्या गाडीवर दगडफेक केली होती. ते सगळे चिडून संगीता चंदवनकरवर हल्ला करण्यासाठी इथे आले होते, असा दावा वामन म्हात्रे यांनी  केला आहे. तसेच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोललो.. ते म्हणाले की, ही केस आपण फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर आरोपीला जास्तीत शिक्षा देण्याचा प्रयत्न करू, असे म्हात्रे यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT