Senthil Balaji : राज्यपाल मंत्र्याची हकालपट्टी करू शकतात, कायदा काय सांगतो?
सेंथिल बालाजी अटक प्रकरण : राज्यपालांनी एका मंत्र्याला पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यास सरकार कोर्टात जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT

Senthil Balaji, R N Ravi Governor : तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवि यांनी अटकेत असलेले मंत्री सेंथिल बालाजी यांची तडकाफडकी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. राज्यपालांच्या या निर्णयावर प्रचंड टीका झाली, त्यानंतर त्यांनी निर्णयाला स्थगितीही दिली. पण, कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार राज्यपालांना आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने घटनातज्ज्ञांशी चर्चा करून एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
राजभवनाने जारी केलेल्या राज्यपालांच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सेंथिल बालाजी मंत्रिमंडळात राहिल्यास ते त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळेच त्यांची तडकाफडकी बडतर्फी करण्यात आली आहे.’
हेही वाचा >> Rahul Kanal News : आदित्य ठाकरेंचा ‘खास माणूस’ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर
गृह मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती समोर आलीये की, सेंथिल यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा राज्यपालांचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. सेंथिल यांना बडतर्फ करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य आहे की नाही, याचा निर्णय अॅटर्नी जनरलच्या कायदेशीर सल्ल्यानंतर घेतला जाईल. असं असलं तरी कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार राज्यपालांना आहे की नाही?
राज्यपाल मंत्र्याला मंत्रिमंडळातून बडतर्फ करू शकतात का?
घटनेच्या कलम 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाईल आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल करतील अशी तरतूद आहे. अशाप्रकारे राज्यपालांना ना कोणाची नियुक्ती करण्याचा किंवा मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच राज्यपाल मंत्रिमंडळात मंत्र्याची नियुक्ती करू शकतात.