Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार ‘या’ नेत्याला उतरवणार मैदानात?

भागवत हिरेकर

बारामती लोकसभा मतदारसंघातून 2024 अजित पवारांनी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनातील उमेदवार कोण, याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

Who will be ajit pawar's ncp candidate against supriya sule in baramati lok sabha election 2024
Who will be ajit pawar's ncp candidate against supriya sule in baramati lok sabha election 2024
social share
google news

Baramati Lok Sabha 2024 Election : ‘माझ्या विचारांचा खासदारच निवडून आला पाहिजे. लोकसभेला मिठाचा खडा लागला, तर विधानसभेत वेगळा निर्णय घेईल’, असे अजित पवार बारामतीत म्हणाले. 4 फेब्रुवारी रोजी अजित पवारांनी दोन कार्यक्रमात थेट सुप्रिया सुळे आणि शरद पवारांविरुद्ध दंड थोपटले. त्यामुळे अजित पवारांचा उमेदवार कोण असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांचं नाव यात नाही. तो नेता कोण आणि त्याची इतकी चर्चा का होतेय?

अजित पवार काय म्हणाले ते आधी वाचा…

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचे कार्यक्रम झाले. ‘लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल.”

“आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही’, असा इशारा अजित पवारांनी दिला.

हेही वाचा >> ‘कुणाच्या बापाचं ऐकणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा

पुढे ते असेही म्हणाले की, “लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहे. मी उमेदवार आहे, असे म्हणून मतदान करा. शेवटची निवडणूक आहे, असे सांगून भावनिक आवाहन केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहिती?”, असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp