Santosh Deshmukh Murder Case: धनंजय मुंडे राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले, पण वाल्मिक कराडचं नावंही..

मुंबई तक

Dhananjay Munde: वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी सध्या जोरदार मागणी सुरू आहे. ज्याबाबत धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

(फाइल फोटो)
(फाइल फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी

point

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर

point

धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच केलं राजीनाम्याबाबत भाष्य

मुंबई: संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड याच्यावर असलेल्या खंडणीचा आरोप याची सध्या सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळेच आता विरोधक हे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कारण अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय आहे. याचबाबत आज (2 जानेवारी) पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं आहे. (beed santosh deshmukh murder case dhananjay munde spoke about resignation for the first time but did not even mention walmik karad name)

आपला या कोणत्याही प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीचं असल्याचं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. पण माध्यमांशी बोलताना त्यांनी एकदाही वाल्मिक कराड याचं नाव घेतलं नाही.

हे ही वाचा>> Beed : बीडमध्ये पुन्हा तशीच घटना, माजी सरपंचाला उचललं, डांबून ठेवलं, पायात कुलूप असलेल्या अवस्थेत...

पाह धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले...

'मी राजीनामा द्यावा याचं काही तरी कारण लागेल ना? या कुठल्याही प्रकरणात मी ना आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थाअर्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा बाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा. अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जणं मागतायेत.'

'विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण अशा पद्धतीचं छोटा आका, मोठा आका ही पहिल्यांदाच भाषा मी ऐकतो आहे. कोणाचा एन्काउंटर आणि कोणाचं काय.. या अशा गोष्टी नाहीए. पोलीस प्रशासन आणि सीआयडी हे व्यवस्थितपणे तपास करत आहेत.'

हे वाचलं का?

    follow whatsapp