INDIA : बंगळुरुतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींवर ‘वार’, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
social share
google news

देशातील विरोधी पक्षांची आज बंगळुरुत दुसरी बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्षानी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीमागचा तपशील प्रसिद्धी माध्यमांना सांगितला होता. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (UBT)चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. (bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp)

कॉंग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूत 26 विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षाने त्यांच्या पक्षाने नाव ‘INDIA’असल्याचे जाहिर केले आहे. या ‘INDIA’चा अर्थ त्यांनी इंडियन नेशनल डेमोक्रेटीक इंक्लुसिव अलायंन्स (indian national democratic inclusive alliance) असा सांगितला आहे. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे (UBT)चे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्षाची आज दुसरी मिटींग यशस्वी झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला म्हटले. काही लोकांना वाटतंय कुटुंबासाठी लढतायत,पण हा देश आमचं कुटुंब आहे, त्यामुळे आम्ही कुटुंबासाठी लढतोय. या कुटुंबाला आम्हाला वाचवायचं आहे असे ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?

देशातील हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, आम्ही वेगळ्या विचाराचे असलो तर आम्ही देशासाठी एकत्र आलो आहोत. देशातील जनता हे आमचे कुटुंब आहे, आणि या कुटुंबाला वाचवण्यसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आमची लढाई पक्षाशी नाही आहे, नाही एका व्यक्तीविरोधात आहे, नीतीविरूद्ध आणि हुकूमशाही विरूद्ध असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. जशी आझादीची लढाई आधी लढली गेली होती, तशाच आझादीसाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, आणि मला विश्वास आहे आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

देशातील जनतेच्या मनात जी भीती आहे, त्यांना मी सांगू इच्छीतो, घाबरू नका आम्ही आहोत. जसा तो सिनेमा आला होता ”में हू ना, तसे हम है ना!”. तसेच का घाबरत आहात, चिंता नका करू. एक व्यक्ती आणि पक्ष म्हणजे देश नाही, असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला. तसेच विरोधी पक्षाची पुढची मिटींग मुंबईत होणार आहे. याची तारीख लवकरत सांगू असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान मुंबईतील मिटींगमध्ये 11 लोकांची कमिटी बनवण्यात येणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तुमच्या पक्षाचा चेहरा कोण असणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी ती छोटी गोष्ट आहे, लगेच करून टाकू, असे उत्तर दिल्याची एकच चर्चा रंगली आहे. आता आगामी लोकसभा निवडणूकीत इंडिया विरूद्ध भाजपप्रणित एनडीए अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : INDIA vs NDA : रणनीती ठरली! 11 नेते, सचिवालय… आता मुंबईत बैठक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT