MLA Disqualification : “मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला?”
mla disqualification case maharashtra : राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. भरत गोगावले यांची उलटतपासणी झाली. यात त्यांनी काय उत्तरे दिली… जाणून घ्या.
ADVERTISEMENT
Bharat Gogawale Mla Disqualification latest News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही गटाच्या काही नेत्यांची उलटतपासणी झाली. सुरुवातीला ठाकरे गटाच्या नेत्यांची चौकशी करण्यात आली. नंतर शिंदे गटाच्या नेत्यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी करण्यात आली. यात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचीही उलटतपासणी झाली. मंगळवारी (12 डिसेंबर) झालेल्या उलटतपासणीत गोगावलेंना ठाकरेंचे वकील देवदत्त कामत निर्णायक मुद्दे उपस्थित करत सवाल केले.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची उलटतपासणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी काही सवाल केले. यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला.
कामतांनी नेमके कोणते प्रश्न विचारले, ते आधी समजून घ्या…
देवदत्त कामत – हा जो 21 जून 2022 चा ठराव होता. त्यानंतर आपली मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली, हे बरोबर आहे का?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
भरत गोगावले – हो, बरोबर आहे.
देवदत्त कामत – हे आताचं डॉक्युमेंट वगळता तुम्हाला मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याचा आधार म्हणून दुसरा कुठलाही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र नाही, हे खरे आहे का?
ADVERTISEMENT
भरत गोगावले – आमच्या सर्व आमदारांनी बसून एकत्रित माझी निवड करून नियुक्ती केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
देवदत्त कामत – तुमची जी नेमणूक करण्यात आली, ती या एकाच ठरावाच्या आधारावर करण्यात आली का?
भरत गोगावले – मला माहिती नाही.
देवदत्त कामत – आपण जो ठराव बघितला तो ठराव कुठे तयार करण्यात आला आणि त्यावर स्वाक्षरी कधी करण्यात आली?
भरत गोगावले – मला नेमके आठवत नाही.
हेही वाचा >> “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”
देवदत्त कामत – 21 जून 202 रोजी सुनील प्रभू यांनी एक व्हीप जारी केला होता, तो तुम्हाला प्राप्त झाला होता का?
भरत गोगावले – नाही.
देवदत्त कामत – एकनाथ शिंदेंनी जो उल्लेख केलेला आहे की 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांना दुपारी साडेबारा वाजता ठराव पास करून नियुक्त करण्यात आले. हे एकनाथ शिंदे यांना कसे कळले?
भरत गोगावले – मला माहिती नाही.
देवदत्त कामत – उद्धव ठाकरे यांचे सरकार तुम्हाला खाली खेचायचे होते म्हणून ठरावाची प्रत राज्यपालांना पाठवण्यात आली होती का?
भरत गोगावले – हे चूक आहे.
देवदत्त कामत – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांच्या काळात मंत्री होते का?
भरत गोगावले – नाही.
हेही वाचा >> “विश्वासदर्शक ठरावावेळी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, कारण…”, सुनावणीतील सर्व युक्तिवाद
देवदत्त कामत – जून 2022 ते जुलै 2022 यादरम्यान आपण मीडियाला ज्या मुलाखती दिल्या, त्यामध्ये आपण महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनण्याची इच्छा दर्शवली होती, हे खरे की खोटे?
भरत गोगावले – नाही. मी अजून कुठे मंत्री झालो आहे?
देवदत्त कामत – तुम्हाला मंत्री व्हायचं होतं आणि तुम्हाला मंत्री केलं नाही म्हणून आणि आमदार म्हणून आपण उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला, हे खरे आहे का?
भरत गोगावले – नाही, हे खोटे आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून भरत गोगावले हे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना संधी मिळालेली नाही. अलिकडेच मंत्री होऊ दे अशी प्रार्थना गोगावले यांनी महादेवाला केली होती. नेमक्या याच मुद्द्यावरून ठाकरेच्या वकिलांनी भरत गोगावलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT