भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेले डॉ.अजित गोपछडे नेमके कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Gopchade
Ajit Gopchade
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉ.अजित गोपछडे नेमके कोण आहेत?

point

गोपछडेंच्याच नावाची चर्चा का होतेय?

point

अजित गोपछडे यांना आहे सामाजिकतेचा वारसा

Rajya Sabha Election 2024: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला  सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीचीही जोरदार चर्चा होऊ लागली. त्यातच आज भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आपले उमेदवार जाहीर करताच त्याचीही जोरदार चर्चा होऊ लागली. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchhade) यांची नावं जाहीर झाल्यानंतर अजित गोपछडे नेमके कोण असा सवालही उपस्थित होऊ लागला. 

ADVERTISEMENT

 डॉ. अजित गोपछडेंची चर्चा

भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरु झाली आहे ती, डॉ. अजित गोपछडे यांची. कारण ते नेमके कोण आहेत, त्यांना उमेदवारी का देण्यात आली अशीही चर्चा होऊ लागली आहे. 

 मला आश्चर्याचा धक्का 

डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाची भाजपने घोषणा केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'उमेदवारीची बातमी मलाही माध्यमांतून बातमी आल्यानंतरच समजली आहे. त्यामुळे साहजिकच मला आश्चर्याचा धक्का बसला असंही त्यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

डॉ. गोपछडे नेमके कोण ?

डॉ. अजित गोपछडे यांना सामाजिकतेचा वारसा हा त्यांच्या अगदी घरण्यापासून मिळाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या  डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहिले आहे. ते बालरोगतज्ज्ञ असून नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा होती. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी मिळताच त्यांच्या पक्षनिष्ठेला फळ मिळाल्याची चर्चा होऊ लागली आहे. 

सामाजिक कार्यात अग्रेसर

 डॉ. अजित गोपछडे यांचं मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. त्यांचे गोपछडे कुटुंब हे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. 

ADVERTISEMENT

शिक्षणाचा प्रवास

अजित गोपछडे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयातून तर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून केले आहे. पदव्युत्तर शिक्षण  बीडमधील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून केले आहे. 

ADVERTISEMENT

मार्ड चळवळीचं नेतृत्व

अजित गोपछडे अगदी महाविद्यालयामध्ये असल्यापासून त्यांनी मार्ड चळवळीचे नेतृत्व केले. हे काम करत असताना त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितिन गडकरी यांच्या माध्यमातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले.

गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढीही सुरु

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी  नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. हे काम करत असताना त्यांनी गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढीही सुरु केली आहे.

हे ही वाचा >> Live : 'जरांगे पाटलांची फसवणूक केली'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT