Partywise Portfolio Allocation: भाजपकडे गृह, महसूल.. महायुतीत कोणत्या पक्षाकडे कोणती खाती?
Partywise Cabinet Portfolio Allocation: महाराष्ट्रातील फडणवीस मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. पाहा कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फडणवीस सरकारने जाहीर केलं खाते वाटप
भाजपने गृह, महसूल ही महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली
पाहा कोणत्या पक्षाला कोणती महत्त्वाची खाती मिळाली
BJP Shiv Sena NCP Minister Portfolio list: नागपूर: फडणवीस सरकारचं खाते वाटप हे शनिवारी (21 डिसेंबर) रात्री उशिरा जाहीर झालं. यामध्ये महायुतीतील तीनही पक्षांना काही महत्त्वाची खाती वाटण्यात आली असल्याचं दिसून येत आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे नेमकी कोणती खाती गेली आहेत. (bjp has home and revenue portfolios which portfolios do shiv sena and ncp have in the grand mahayuti know partywise portfolio allocation)
सगळ्यात महत्त्वाचं समजलं जाणारं गृह खातं हे भाजपने आपल्याकडेच ठेवलं आहे. तर महसूल सारखं महत्त्वाचं खातंही भाजपने स्वत: राखलं आहे. तर याशिवाय नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण ही खाती शिवसेनेला दिली आहे. तर अर्थ, उत्पादन शुल्क आणि कृषी ही महत्त्वाची खाती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत.
हे ही वाचा>> Portfolio Allocation: अखेर... खाते वाटप जाहीर! शिंदे-अजितदादांना भाजपने काय दिलं?, पाहा संपूर्ण यादी
एकीकडे आज हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आणि दुसरीकडे मंत्रिमंडळाचं खाते वाटप हे जाहीर करण्यात आलं. दरम्यान, या खातेवाटपात भाजपने आपल्या दोन्ही सहकाऱ्यांची फारशी नाराजी होणार नाही याकडे अधिक लक्ष दिलं आहे.
पाहा कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळाली
भाजपला कोणती खाती मिळाली?
देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, गृह, ऊर्जा (वगळून अक्षय ऊर्जा), कायदा आणि न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि प्रसिद्धी (आणि इतर कोणत्याही मंत्र्याला वाटप न केलेले विभाग/विषय)










