Chandrashekhar Bawankule: "28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष...", चंद्रशेखर बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलं?

Chandrashekhar Bawankule Press Conference : कोल्हापूरमध्ये विभागीय शाळेत भारतीय जनता पार्टीच्या 1234 कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की, महाराष्ट्रात 1 कोटी 51 लक्ष प्राथमिक सदस्यता असलेली भाजपा आम्ही गठित करत आहोत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण असेल यावर चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण असेल यावर चंद्रशेखर बावनकुळे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

 कोल्हापूरमध्ये विभागीय शाळेत भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न

point

"पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडणुका लढवायच्या असतील, तर..."

point

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule Press Conference : कोल्हापूरमध्ये विभागीय शाळेत भारतीय जनता पार्टीच्या 1234 कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की, महाराष्ट्रात 1 कोटी 51 लक्ष प्राथमिक सदस्यता असलेली भाजपा आम्ही गठित करत आहोत. 1 कोटी 16 लाख मेम्बरशिप आता पूर्ण झाली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष भाजप असेल. महाराष्ट्रात प्रत्येक बुथवर तीन सक्रिय सदस्यता आम्ही ग्रहण करतो आहे. 3 लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही सक्रीय सदस्यत्व देत आहोत. हे कार्यकर्ते संघटनेचे कार्य समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रीय सदस्य असणार आहेत. पंचायत ते पार्यमेंटपर्यंत निवडणुका लढवायच्या असतील, त्यांना सक्रीय सदस्य व्हावं लागतं, असं मोठं विधान भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "बुथ अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असेल, तरीही आमच्याकडे सक्रीय सदस्यता घ्यावी लागते. लवकरच आमच्या बुथ अध्यक्षाच्या निवडी होणार आहेत. लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार आहेत. जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल, इतका विजय पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे. मुख्यमंत्रीपदाचे महाराष्ट्रात 11 बोर्ड लावले होते".

हे ही वाचा >> Ajit Pawar: "आरोप सिद्ध झाला आणि सुई तिथपर्यंत...", सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत अजितदादा नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसच्या 8 लोकांनी बोर्ड लावले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचे चार लोक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. उद्धवजी, आदित्य ठाकरे स्वत: दावेदार झाले होते. या महाराष्ट्रात 11 मुख्यमंत्री फिरून आले होते. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने 3 कोटी 17 लाख मतं आम्हाला दिले. काँग्रेसला 2 कोटी 17 लाख मतांवर थांबले. 1 कोटी मतं आम्हाला जास्त मिळाली. महाराष्ट्रात भाजप-महायुतीचा मोठा विजय झाला. महाराष्ट्राचा मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने केला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल, तर...", चंद्रपूरमध्ये CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

भाजपने विकसित भारत संकल्प केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लवकरच त्यांची यादी जाहीर केली जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपात येण्याची ओढ दिसेल. जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, मला वाटतं जयंत पाटील यांना बदनाम करण्यात काही अर्थ नाही. ते एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. जयंत पाटील केंद्रीय नेतृत्त्वाशी किंवा देवेंद्रजी यांच्याशी बोलले नाहीत. जयंत पाटील यांच्या राजकीय आयुष्यावर कोणताही प्रश्नचिन्ह लावू नये, असं मला वाटतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp