CM फडणवीसांसमोरच पंकजा मुंडेंनी मारला सुरेश धसांना टोमणा... मंचावर काय घडलं?
एका जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भाषणादरम्यान, भाजप आमदार सुरेस धस यांना बरेच टोमणे मारले. ते देखील मुख्यमंत्री फडणवीसांसमोर. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
ADVERTISEMENT

बीड: आष्टीमधील जाहीर कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना टोमणा मारला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी यावरून धनंजय मुंडेंवर बराचा हल्लाबोल केला. अशातच आज (5 फेब्रुवारी) सुरेश धस आणि पंकजा मुंडे हे आमनेसामने आले. ज्यावेळी दोघांनीही एकमेकांना टोले लगावले.
दरम्यान, यावेळी पंकजा मुंडेंनी खासदारकीला झालेल्या पराभवाची सल मात्र बोलून दाखवली. यावरून त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना फडणवीसांसमोरच टोमणाही मारला.
पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...
'मंचावर उपस्थित निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केलं आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा... या जिल्ह्याचे आमदार ज्यांना पहिल्यांदा 2009 मध्ये गुलाल लागला.. जो भाजपमधूनच लागला.. आणि आता 2024 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत ते.. ज्यांनी ही सभा आयोजित करण्यात आणि लोकं जमविण्यात योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोकं टाळ्या वाजवतायेत.'
'राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणलाय म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या जास्त टाळ्या वाजायला लागल्यात ते आदरणीय सुरेश अण्णा धस..'










