Ganpat Gaikwad: ‘… तर माझा जगून काय फायदा?’, शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर भाजप आमदार काय म्हणाला?
BJP MLA Ganpat Gaikwad Reaction : उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाडांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळ्या झाडण्याची ही धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT
BJP MLA Ganpat Gaikwad Reaction : उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Station) झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाडांवर (BJP MLA Ganpat Gaikwad) कारवाई करत त्यांना अटक केली आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळ्या झाडण्याची ही धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायवाड (Shivsena Leader Mahesh gaikwad) गंभीर जखमी झाले आहेत. (BJP MLA Ganpat Gaikwad First Reaction on Firing Shoot On Shivsena Leader Mahesh Gaikwad At ulhasnagar Police Station)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात रात्री 10.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सुधाकर पठारे म्हणाले, ‘महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी होऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. जखमी महेश गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.’
वाचा : BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदेंच्या नेत्यावर झाडल्या 4 गोळ्या, पोलीस ठाण्यात घडलं काय?
या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. हे दोन्ही राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे आहेत. पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेमुळे आता कायदा-सुव्यस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
हे वाचलं का?
भाजप आमदार गणपत गायकवाडांनी सांगितलं गोळीबाराचं कारण…
गोळीबार केल्यानंतर ‘झी 24 तास’शी बोलताना गणपत गायकवाडांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता. काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले.
वाचा : Ganpat Gaikwad: खळबळजनक… BJP आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या 4 गोळ्या
माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला या कृत्याचा पश्चाताप नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. ‘
ADVERTISEMENT
वाचा : संभाजीराजेंचं ठरलं! ‘या’ मतदारसंघातून लढविणार निवडणूक, बोलणी फायनल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणपत गायकवाड म्हणाले की, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी असे गुन्हेगार राज्यभर पाळून ठेवले आहेत. शिंदे मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. तसेच माझ्यावर अन्याय होत असल्याची कल्पना वरिष्ठांना दिली होती,’ असंही गायकवाड यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT