'...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला', भाजप आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, Video प्रचंड व्हायरल

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Mla Tekchand Sawarkar Viral Video
Mla Tekchand Sawarkar On Ladki Bahin Yojana News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदाराचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

लाडकी बहीण योजनेबाबत केलं खळबळजनक वक्तव्य

point

विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाने शेअर केला व्हिडीओ

Mla Tekchand Sawarkar On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. महायुती सरकारने राजकीय स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली, असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली असताना भाजप आमदार टेकचंद सावरकरांनी खळबळजनक विधान केलं आहे. 'भाजपला मतदान मिळावं, यासाठी आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला आहे', असं नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सावरकर यांनी म्हटलं आहे. सावरकर यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Since the launch of Chief Minister Majhi Ladki Bahine Yojana, the opposition has been raising criticism against the ruling party)

ADVERTISEMENT

भाजप आमदार टेकचंद सावरकर काय म्हणाले?

लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर कामठी विधानसभा मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, 'भाजपला मतदान मिळावं, यासाठी आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला आहे. एव्हढी मोठी भानगड कशासाठी केली आहे, तुमच्या अंत:करणाने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरासमोर निवडणुकीची पेटी येईल, त्या दिवशी माझी लाडकी बहीण कमळाला मतं देईल. यासाठी आम्ही हा जुगाड केला आहे. हे सर्व खोटे बोलत असतील. मी खरं बोलत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हा व्हिडीओ सोशल इंटरनेटवर पोस्ट केला आहे. अखेर भाजपच्या आमदाराने खऱ्या गोष्टी समोर आणल्या, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

हे ही वाचा >> Urmila Matondkar Divorce: उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेणार? 8 वर्षानंतर पती मोहसीनसोबत काय बिनसलं?

विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरवर केला व्हिडीओ शेअर

"अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे", असं विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : वृषभ राशीच्या लोकांनी राजकारणात अजिबात करु नका एन्ट्री! कर्क राशीला मिळेल पैसाच पैसा? तुमचं भविष्य काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT