BJP 2nd list : ठाकरेंनी दिला पडत्या काळात हात, पण 'त्या' खासदाराने BJPसोबत साधला भलताच डाव

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp second list released kalaben delkar ticket  dadar nagar haveli seat udhhav thackeray bye election mohan delkar
दादरा नगर हवेलीतून भाजपने कलाबेन डेलकर यांना तिकीट दिलं आहे.
social share
google news

Bjp Second list, Kalaben Delkar Dadar Nagar Haveli  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत दादरा नगर हवेलीतून भाजपने कलाबेन डेलकर यांना तिकीट दिलं आहे. कलाबेन डेलकर या त्याचं उमेदवार आहेत, ज्यांना पोटनिवडणुकीत भाजपने डावललं होतं आणि ठाकरे गटाकडून त्यांना निवडणूक लढवावी लागली होती. या निवडणुकीत त्या जिंकल्या देखील होत्या. त्यामुळे पोटनिवडणूकीत झालेला पराभव लक्षात घेता, भाजपने आता त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (bjp second list released kalaben delkar ticket dadar nagar haveli seat udhhav thackeray bye election mohan delkar) 

ADVERTISEMENT

खरं तर मोहन डेलकरांच्या निधनानंतर दादरा नगर हवेलीत पोटनिवडणुक लागली होती. या निवडणुकीत भाजपने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी न देता महेश गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी कलाबेन डेलकर यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित यांचा 51,269 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. 

हे ही वाचा : भाजपची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची संपूर्ण यादी

दरम्यान काळात एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेत फुट पडली होती. या फुटी दरम्यान कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना डेलकर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनतंर कलाबेन डेलकर भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चा सूरू झाल्या होत्या. आणि अखेर तेच झालं आणि आता कलाबेन डेलकर यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी  2021 रोजी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केली होती तेव्हा राज्यात महाविकास आघडीच सरकार होतं. त्यावेळी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाला होता. 

हे ही वाचा : Lok Sabha : संजय निरूपम-अशोक चव्हाण भेटीमागे काय शिजतंय?

दरम्यान 58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT